---Advertisement---

IND vs ENG; कर्णधार जोस बटलरची एकतर्फी झुंज! भारतासमोर 166 धावांचे आव्हान

On: शनिवार, जानेवारी 25, 2025 8:44 PM
---Advertisement---

भारत-इंग्लंड (India vs England) संघातील दुसरा टी20 सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने भारतासमोर 166 धावांचे लक्ष्य उभारले आहे. दरम्यान इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) एकतर्फी झुंज दिली.

भारताने टाॅस जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. प्रत्युतरात इंग्लंड संघाने 9 गडी गमावून 165 धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) इंग्लंडसाठी 150च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक 45 धावा केल्या. दरम्यान त्याने 2 चौकारांसह 3 षटकार लगावले. तर ब्रायडन कार्सेने (Brydon Carse) 31 धावांची खेळी केली. जेमी स्मिथ 22 धावा, हॅरी ब्रुक 13 धावा, लियाम लिव्हिंगस्टोन 13 धावा, जोफ्रा आर्चर 12 धावा, आदिल राशिद 10 धावा यांच्या जोरावर इंग्लंडने 165 धावा केल्या.

भारतासाठी उपकर्णधार अक्षर पटेलने (Axar Patel) फिरकीची जादू दाखवत 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या, तर वरूण चक्रवर्तीने (Varun Chakravarthy) पुन्हा एकदा इंग्लंडची फिरकी घेत 2 फलंदाजांना तंबूत पाठवले. अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, वाॅशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स आपल्या नावावर केली. आता भारतीय संघ 166 धावा करण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरेल.

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-

भारत-संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती

इंग्लंड- बेन डकेट, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs ENG; दुसऱ्या टी20 सामन्यातही शमीला संधी नाही, कधी होणार पुनरागमन?
25 वर्षीय भारतीय खेळाडूनं जिंकला ‘आयसीसी मेन्स टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार!
IND vs ENG; भारतानं जिंकला टाॅस, ‘या’ स्टार खेळाडूला पुन्हा वगळले! 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---