भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघातील तिसरा टी20 सामना राजकोटच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी कराणाऱ्या इंग्लंड संघाने भारतासमोर 172 धावांचे आव्हान ठेवले आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टाॅस जिंकून इंग्लड संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात इंग्लंड संघ 171 धावांवर गारद झाला. इंग्लंडसाठी बेन डकेटने (Ben Duckett) सर्वाधिक 51 धावा केल्या. दरम्यान त्याने 7 चौकारांसह 2 षटकार लगावले. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingostone) इंग्लंडसाठी दुसरा सर्वाधिक धावसंख्या करणारा खेळाडू ठरला. त्याने 24 चेंडूत 43 धावा केल्या. दरम्यान त्याने 5 षटकारांसह 1 चौकार लगावला. तर कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) 22 चेंडूत 24 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत त्याने 1 चौकार आणि 1 षटकार लगावला.
भारतासाठी युवा प्रतिभावान फिरकी गोलंदाज वरूण चक्रवर्तीने (Varun Chakravarthy) आपली जादू दाखवत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तर फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई (Ravi Bishnoi), अक्षर पटेल (Axar Patel) यांनी 1-1 विकेट्स घेतली. आता भारतीय संघ 172 धावांचा कशा पद्धतीने पाठलाग करतो, हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरेल.
तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइग 11-
भारत-संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ध्रुव जुरेल, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड-फिलिप साल्ट, बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा पुढचा विराट-रोहित कोण? माजी क्रिकेटपटूंची मोठी प्रतिक्रिया
बुमराहने रचला इतिहास..! अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज
IND vs ENG; भारताने जिंकला टाॅस; मोहम्मद शमीचे पुनरागमन! जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11