ऍशेस 2023चा तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. गुरुवारी (6 जुलै) या सामन्याची सुरुवात झाली असून इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचा जेम्स अँडरस, तर ऑस्ट्रेलियाचा नेथन लायन हे दिग्गजांना या सामन्यातून वगळले गेले आहे. स्टीव स्मिथ याच्या कसोटी कारकिर्दीतील हा 100वा सामना आहे.
हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंडने एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी (5 जुलै) संघ घोषित केला होता. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन, जोश टंग आणि ओली पोप या तिघांना हेडिंग्ले कसोटीसाठी संघात निवडले गेले नाहीये. त्यांच्या जागी मार्क वुड, ख्रिस वोक्स आणि मोईन अली या तिघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले गेले आहे. गुरुवारी (6 जुलै) हेडिंग्ले कसोटीची नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपली प्लेइंग इलेव्हन घोषित केली. यात देखील तीन महत्वाचे बदल पाहायला मिळाले. कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक गमावल्यानंतर माहिती दिली की, कॅमरून घ्रीन याच्या जागीर मिचेल मार्श खेळणार आहे. नेथन लायनच्या जागी टॉड मर्फी, तर जोश हेजलवूडच्या जागी स्कॉट बोलँडला निवडले गेले आहे.
https://twitter.com/ICC/status/1676888019700178944?s=20
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, ओली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड.
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड.
(England have won the toss and opted to bowl first.)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी नाही मिळाली संधी! केकेआरच्या स्टार फलंदाज नाराज
BREAKING: वर्ल्डकपआधी बांगलादेशला जबर धक्का! कर्णधार तमिम इक्बालची तडकाफडकी निवृत्ती