नुकताच १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (IPL 2022) मेगा लिलाव (Mega Auction) पार पडला आहे. या लिलावात बऱ्याच खेळाडूंवर मोठ्या बोली लागल्या तर अनेकांना कोणीही खरेदीदार मिळाला नाही. त्यातही आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने एका अशा खेळाडूवर मोठी बोली लावली, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. ते नाव म्हणजे, जोफ्रा आर्चर (Jofra Archer).
इंग्लंडचा हा वेगवान गोलंदाज गेल्या बऱ्याच महिन्यांपासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. तो यंदाही आयपीएलमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता फार कमी आहे. तरीही मुंबईने त्याच्यावर ८ कोटींची मोठी रक्कम खर्च केली आहे. त्यांच्या या निर्णयावर आता संघ मालकीण नीता अंबानी (Mumbai Indians Owner) यांनी प्रतिक्रिया दिली (Nita Ambani On Jofra Archer) आहे.
इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला जोफ्रा आर्चरला आयपीएल २०२२ हंगामासाठी मुंबई इंडियन्सने ८ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. आर्चरसाठी लिलावात राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये चूरस पाहायला मिळाली होती. पण अखेर मुंबईने यात बाजी मारली. मात्र आर्चर कोपऱ्याच्या शस्त्रक्रियेतून बरा होत असल्याने तो या हंगामात खेळताना दिसण्याची शक्यता फार कमी आहे. तो गेल्या हंगामातही दुखापतीमुळे खेळला नव्हता.
His pace. His precision. His tweets.
Jofra Archer is 𝗜𝗡𝗘𝗩𝗜𝗧𝗔𝗕𝗟𝗘 🔥#OneFamily #MumbaiIndians #AalaRe #TATAIPLAuction #IPLAuction @JofraArcher pic.twitter.com/AH23A19cQB
— Mumbai Indians (@mipaltan) February 14, 2022
यावर लिलाव संपल्यानंतर मुंबईच्या संघ मालकीण नीता अंबानी (Nita Ambani) म्हणाल्या की, मुंबई इंडियन्स नेहमी लघुकालिन लक्ष्य आणि दीर्घकालिन दृष्टीकोन ठेवून निर्णय घेते. आम्ही या लिलावात जेवढेही खेळाडू विकत घेतले आहेत, त्यापैकी काहींची निवड दीर्घकालिन दृष्टीकोन ठेवूनच केली गेली आहे. आम्ही केवळ आमच्या प्रशंसकांना आश्वस्त करू इच्छित आहोत की, आम्ही लिलावात आमचे सर्वश्रेष्ट दिले आहे. आम्ही निवडलेले खेळाडू भविष्यात चांगले खेळतील आणि आमच्या प्रशंसकांना खुश करतील अशी अपेक्षा करते. आम्ही आम्हाला जे काही मिळाले आहे, त्यात खुश आहोत.
मुंबई इंडियन्स –
उर्वरित किंमत – १० लाख
संघातील खेळाडू – २५ (परदेशी ८)
संघ – रोहित शर्मा (कर्णधार), कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बासिल थंपी, एम अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टिळक वर्मा, संजय यादव, रिले मेरेडिथ, मोहम्मद अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन ऍलन