येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा लिलाव सोहळा १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे पार पडला. या लिलाव सोहळ्यात अनेक युवा खेळाडू कोट्यवधी झाले तर दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. कोट्यावधींची कमाई करणाऱ्या युवा खेळाडूंपैकी एक म्हणजे तिलक वर्मा. मुंबई इंडियन्सने त्याला १.७ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याची निवड झाल्यानंतर त्याच्या मित्रांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बेंगलोरच्या आईटीसी गार्डेनिया हॉटेलमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात तिलक वर्मावर लागलेल्या प्रत्येक बोली वर त्याच्या मित्रांचा उत्साह वाढताना दिसून येत होता. त्याचे मित्र एकत्र येऊन लिलाव सोहळा टीव्हीवर पाहत होते. प्रत्येक बोली नंतर ते तिलक वर्माला चीयर करताना दिसून आले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तिलक वर्मा सध्या हैदराबाद संघासाठी रणजी क्रिकेट खेळतोय. तसेच त्याने भारतीय १९ वर्षाखालील संघासाठी त्याने क्रिकेट खेळले आहे. या संघात प्रवेश करण्यापूर्वी त्याने १६ वर्षाखालील संघात चांगली कामगिरी केली होती. तसेच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत त्याने १८० धावा केल्या होत्या. तसेच दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने १३९ धावांची खेळी केली होती.
आगामी हंगामात तो मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. त्याला रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि इशान किशन यांसारख्या मोठ्या खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी मिळणार आहे.
आगामी हंगामासाठी असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ :
रिटेन खेळाडू – रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह.
ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, एम अश्विन, बसिल थम्पी, फॅबियन ऍलन, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, ऋतिक शोकीन, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, अनमोलप्रीत सिंग, अर्शद खान, रिले मेरेडिथ, टिम डेव्हिड, टायमल मिल्स, डॅनियल सेम्स, जोफ्रा आर्चर , संजय यादव, तिलक वर्मा, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
महत्वाच्या बातम्या :
मेगा लिलावानंतर भारतीय दिग्गजाने ‘या’ तीन संघांना म्हटले सर्वात मजबूत
मुंबई इंडियन्समध्ये सामील होताच अर्जुन तेंडुलकर खुश, तर बहीण साराने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
‘रेकॉर्डतोड’ चौदा कोटींची बोली लागूनही दीपक चहर नाराज; म्हणाला, “ती इच्छा राहिली अपूर्ण”