रांची कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघाकडे 134 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 7 विकेट्सच्या नुकसानावर 219 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडच्या तळातील तीन विकेट्स भारताला दुसऱ्या दिवशी झटपट मिळाल्या. पण भारतीय फलंदाज देखील खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकले नाहीत. एकट्या यशस्वी जयस्वाल याने अर्धशतक झळकावले. दुसरीकडे इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर याने सर्वोत्तम गोलंदाजी केली.
दुसऱ्या दिवसाची सुरुवातीला इंग्लंड संघाचा पहिला डाव सुरु होता. जो रुट (106*) आणि ओली रॉबिन्सन (31*) यांनी दुसऱ्या दिवशी इंग्लंडसाठी डावाची सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी 15 षटकांचा खेळ पूर्ण होण्याआधी इंग्लंड संघ सर्वबाद झाला. इंग्लंडने या सामन्याच्या पहिल्या डावात 104.5 षटकात 353 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. भारतासाठी पहिल्या डावात रविंद्र जडेजा याने सर्वाथिक 4, आकाश दीप याने 3, मोहम्मद सिराज याने 2, तर रविचंद्रन अश्विन याने एक विकेट घेतली.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारताला फलंदाजीची संधी मिळाली. कर्णधार रोहित शर्मा याने वैयक्तिक दोन धावांची खेळी करून विकेट गमावली. शुबमन गिल याच्या रुपात भारताने दुसरी विकेट गमावली. जयस्वालसोबत खेळपट्टीवर सेट झालेला गिल 65 चेंडूत 38 धावा करून बाद झाला. त्यावेळी संघाची धावसंख्या 86 होती. संघाची धावसंख्या 112 अशताना रजत पाटीदार वैयक्तिक 17 धावांवर बाद झाला. यशस्वी जयस्वाल याही सामन्यात शतक करेल, असे चाहत्यांना वाटत होते. पण 117 चेंडूत 73 धावा करून जयस्वालनेही विकेट गमावली.
जयस्वालच्या रुपात पाचवी विकेट गमावल्यानंतर सरफराज खान याच्याकडून चाहत्यांना अपेक्षा होता. कारकिर्दीतील दुसरा कसोटी सामना खेळताना सरफराज विकेट जाणार नाही, याची काळजी घेत होता. फण इंग्लिश गोलंदाजांनी आणलेला दबाव त्याच्या विकेटचे कारण ठरला. त्याने 14 धावा करून विकेट गमावली. गोलंदाजी अष्टपैलू रविचंद्रन अश्विन याने अवघी एक धाव करून विकेट गमावली. दिवसाखेर ध्रुव जुरेल 30* आणि कुलदीप यादव 17* धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत.
Stumps on Day 2 in Ranchi!
A valuable unbeaten partnership between Dhruv Jurel and Kuldeep Yadav helps #TeamIndia move to 219/7 👏
Scorecard ▶️ https://t.co/FUbQ3MhXfH#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/fhnl0yrMbP
— BCCI (@BCCI) February 24, 2024
दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट्स शोएब बशीर याने घेतल्या. शोएबने 32 चेंडूत 84 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या. टॉम हार्टली यानेही 19 षटकात 47 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या. जेम्स अँडरसन यानेही एक विकेट घेतली. (England lead by 134 runs at the end of the second day of Ranchi Test)
रांची कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन
भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप (पदार्पण), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या –
IND Vs ENG : चौथ्या कसोटीत अंपायर्स कॉल वरून वाद! घ्या जाणून नेमकं काय आहे कारण
रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी गायले विचित्र गाणं, म्हणाले ‘Bye Bye Rohit…