पहिल्या कसोटीनंतर इंग्लंडचे माजी दिग्गज खेळाडू नासिर हुसेन (Nasir Hussain) यांनी शुबमन गिलच्या कर्णधारपदावर टीका केली. पण रविवारी जेव्हा गिलच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला हरवून इतिहास रचला, तेव्हा नासिर गिलचे कौतुक करताना दिसले. त्यांनी गिलची तुलना विराट कोहलीशी केली. ते म्हणाले की गिल मैदानावर कोहलीसारखा नाही, तो खूप शांत आहे.
सामन्यानंतर नासिर म्हणाला, “मला वाटतं ते खूप महत्त्वाचं होतं, मला वाटतं ते आज जास्त दृश्यमान होतं.” जेव्हा आपण हरतो तेव्हा आपण सगळा दोष कर्णधारावरती टाकतो आणि म्हणतो की हा चांगला खेळतच नाही, आणि जेव्हा जिंकतो तेव्हा आपण म्हणतो की, तो एक चांगला खेळाडू आणि कर्णधार आहे. पण मला वाटतं जेव्हा मी हेडिंग्लेमध्ये कॉमेंट्री बॉक्स पाहत होतो, तेव्हा अनेक लोकांकडून खूप इनपुट येत होते आणि ते असं होतं, ‘इन्चार्ज कोण आहे?’ आज, जेव्हा तुम्ही खाली पाहता, तेव्हा तो इन्चार्ज होता आणि कॅमेरा नेहमीच त्याच्यावर होता आणि तो क्षेत्ररक्षकांना इकडे तिकडे हलवत होता. त्याला अजूनही रिषभ पंत आणि केएल राहुलची मदत हवी आहे, पण तो इन्चार्ज दिसत होता.”
नासिर पुढे म्हणाले, “तो नेहमीच शांत आणि संयमी राहील. तुम्ही आत्ताच मुलाखत पाहिली. त्याच्या हृदयाचे ठोके खूप मंद आहेत. तो कोहलीसारखा असणार नाही. त्याच्या हृदयाचे ठोके मंद आहेत, पण तो मदत करू शकतो. आज इथे असलेल्या गर्दीकडे पहा. संपूर्ण भारत पाहत आहे. संघाला शांत करण्यासाठी तुम्हाला कदाचित कोणीतरी हवे असेल.”






