इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटी चांगलीच रोमांचक झाली. ऍशेस 2023चा हा दुसरा सामना असून ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्या डावात स्टीव स्मिथ तर चौथ्या डावात बेन स्टोक्स यांनी नेत्रदीपक फलंदाजी करत आपल्या संघासाठी शतके ठोकली. स्टोक्स इंग्लंडला विजय मिळवून देईल, अशी सर्वांच चाहत्यांना आशा होती. मात्र, 155 धावंची खेळी करून त्याने विकेट गमावली आणि इंग्लंडच्या हातून सामनाही निसटला. ऑस्ट्रेलियाने 43 धावांनी विजय मिळवला.
इंग्लंडला शेवटच्या दिवशी 256 धावांची आवश्यकता होती. चौथ्या दिवसाखेर त्यांनी 4 बाद 114 धावा केल्या होत्या. बेन स्टोक्स आणि बेन डकेट यांनी इंग्लंडसाठी शेवटच्या दिवसाची सुरुवात केली. त्यावेळी डकेत 50* तर स्टोक्सने 29* धावा केल्या होत्या. शेवटच्या दिवसी इंग्लंड संघावर दबाव होता. मात्र, कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) खेळपट्टीवर टिकून राहिला आणि संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली.
पाचव्या दिवशी इंग्लंडला डकेटतच्या रूपात पहिला झटका बसला. त्याने वैयक्तिक 83 धावा करून विकेट गमावली. मात्र, स्टोक्स खेळपट्टीवर पाय रोवून होता. 52व्या षटकात यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो नाटकीय पद्धतीने यष्टीचीत झाला. बेअरस्टो महत्वाच्या वेळी अवघ्या 10 धावा करून तंबूत परतला. स्टोक्स मात्र दुसऱ्या बाजूला टिकून होता. त्याने 142 चेंडूत स्वतःच्या 100 धावा केल्या. इंग्लंडच्या डावातील 56 व्या षटकात स्टोक्सने लागोपाट तीन षटकार मारले. कॅमरून ग्रीनला ही हॅट्रिक मारण्याआधीचा चेंडू स्टोक्सने चौकारासाठी खेळला होता.
शेवटच्या डावातील ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे प्रदर्शन पाहिले, तर कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, आणि जोश हेजलवूड या त्रिकूटने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. कॅमरून ग्रीनला एक विकेट मिळाली. सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियन संघाला आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियने पहिल्या डावात 100.4 षटकांमध्ये 416 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव मात्र 325 धावांवर गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियन संगाला दुसऱ्या डावात अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. पण तरीही त्यांनी 279 धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या डावात इंग्लंडने विजयासाठी 371 धावांचे लक्ष्य मिळाले होते. (England lost to Australia by 43 runs in Lord’s Test)
महत्वाच्या बातम्या –
‘आग लगे बस्ती में, बाबा अपनी मस्ती में’, विंडीज हारताच गेलने शेअर केला व्हिडिओ, चाहत्याची कमेंट चर्चेत
क्वालिफायर्समध्ये श्रीलंका अजिंक्य! 2023 आयसीसी वनडे विश्वचषकातील स्थान पक्के






