---Advertisement---

भुवनेश्वर कुमार पुन्हा दिसणार भारताच्या जर्सीमध्ये! ‘या’ स्पर्धेत करणार टीम इंडियाचे नेतृत्व

On: सोमवार, ऑक्टोबर 5, 2026 2:00 PM
Bhuvneshwar-Kumar
---Advertisement---

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा भारताच्या निळ्या जर्सीमध्ये दिसणार आहे. तो संघाचे नेतृत्व करणार आहे. या भारतीय संघात कृणाल पांड्यासह शशांक सिंग, राहुल तेवातिया, नितीश राणा, राहुल त्रिपाठी आणि टी नटराजन यांचाही समावेश आहे.

‘हाँगकाँग सिक्सस’च्या प्रसिद्धी पत्रकानुसार, भारताचा हा संघ ‘हाँगकाँग सिक्सस 2026’ साठी निवडला गेला आहे. यामध्ये भारताचे कर्णधारपद भुवनेश्वर कुमारकडे सोपवण्यात आले आहे.

क्रिकेटच्या सर्वात वेगवान आणि मनोरंजक प्रकारांपैकी एक असलेल्या क्रिकेटसाठी, या संघात आंतरराष्ट्रीय अनुभव, स्फोटक फलंदाजी, अष्टपैलू क्षमता आणि विशेष गोलंदाजी यांचा संगम आहे. २०२६ ची आवृत्ती ही JSW स्पोर्ट्ससोबतची पहिली व्यावसायिक भागीदार आहे.

या स्पर्धेचा फॉरमॅट केवळ ६ खेळाडूंचा आहे. त्यामुळे प्रत्येक सामने रोमांचक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानवर दोन धावांनी डकवर्थ-लुईसच्या नियमानुसार विजय मिळवून आपल्या २०२५ च्या मोहिमेची सुरूवात करणाऱ्या भारताला त्यानंतरच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि परिणामी स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते.

भारताचा संघ पाहिला तर तो प्रभावी दिसत आहे. एकीकडे भुवनेश्वरकडे अनेक वर्षांचा आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलचा अनुभव आहे. तो नव्या चेंडूने चांगली कामगिरी करतो. तसेच कृणालच्या रूपात संघाला अष्टपैलु लाभला आहे. नितीशच्या असण्याने संघाला फलंदाजीवेळी आक्रमक सुरूवात मिळेल, तर शशांक आणि राहुल हे फिनिशर्सची भुमिका चांगली बजावतील.

टी नटराजनच्या उपस्थितीने भारतीय संघात डावखुरा वेगवान गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध आहे. राहुल त्रिपाठीही सामन्यात आक्रमकता आणण्यास मदत करेल.

२०२६ च्या आवृत्तीमध्ये पाकिस्तान गतविजेता म्हणून खेळणार आहे. या स्पर्धेत आठ प्रमुख देशांसोबत चार सहयोगी सदस्य देश सहभागी होतील. ही स्पर्धा ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे.

भारताचा संघ
भुवनेश्वर कुमार (कर्णधार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), कृणाल पांड्या (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), शशांक सिंग (पंजाब किंग्ज), राहुल तेवातिया (गुजरात टायटन्स), नितीश राणा (दिल्ली कॅपिटल्स), राहुल त्रिपाठी (कोलकाता नाईट रायडर्स), टी नटराजन (दिल्ली कॅपिटल्स)

(Bhuvneshwar Kumar will lead India at the Hong Kong Sixes 2026)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---