ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघात सुरु असलेल्या ऍशेस मालिकेत दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी झुंज दिली, पण शेवटच्या काही षटकांत विकेट्स गेल्या आणि दुसऱ्या डावांत इंग्लंड संघ १९२ धावांवरच गारद झाला. ऑस्ट्रेलियाच्या झाय रिचर्डसनने (Jhye Richardson) आपल्या कारकीर्दीतल्या तिसऱ्याच सामन्यात पाच विकेट हॉल घेतला. यामुळे इंग्लंडला २७५ धावांनी हरवता आलं. गाबा कसोटीमध्येसुद्धा ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सने सहज विजय मिळवला होता. आता ऍडलेडच्या दिवस-रात्र कसोटीत २७५ धावांनी इंग्लंडचा धुव्वा उडवला. इंग्लंसाठी हा पराभव खूप निराशाजनक आहे.
सलग दुसऱ्या पराभवाचा फटका इंग्लंडला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (World Test Championship) बसला आहे. इंग्लंडने आतापर्यंत ६ सामने खेळले असून त्यांना फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला, तर एक सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडकडे १६ गुण होते, पण त्यांनी १० गुण षटकांची गती कमी राखल्याने गमावले. त्यांची विजयाची टक्केवारी आता फक्त ८.३३ झाली आहे. त्यामुळे आता त्यांचं स्पर्धेतलं पुनरागमन कठीण दिसत आहे.
या लेखात आपण ऍडलेड कसोटीत इंग्लंड संघाकडून कोणत्या ३ मोठ्या चूका झाल्या याचा आढावा घेऊ
फिरकीपटू न घेता ऍडलेड कसोटी खेळणं पडलं महागात
इंग्लंडकडून सगळ्यात मोठी चूक ती झाली की, त्यांनी जेव्हा एकमेव फिरकीपटू जॅक लीचला (Jack Leach) प्लेयिंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले. गॅबा कसोटीत तो चांगलं प्रदर्शन करू नाही, शकला म्हणून त्याला प्लेयिंग इलेव्हनच्या बाहेर काढण्यात आलं. हीच चूक इंग्लंड संघाला महागात पडली.
ऍडलेडमध्ये नेहमी फिरकीपटूंना मदत झाली आहे. पण दिवस-रात्र कसोटी असल्याने इंग्लंडने ४ जलद गोलंदाजांसोबत जायचं ठरवलं. ऍडलेडवर सर्वात जास्ती विकेट्स घेणारे २ गोलंदाज, तर ऑस्ट्रेलियाचे फिरकीपटू शेन वॉर्न आणि नेथन लायनच आहे. लायनने चांगलं प्रदर्शन करून पूर्ण सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडे फिरकीपटू गोलंदाज नव्हते, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७३ धावांचा डोंगर केला होता. त्यामुळे रुटला आपली चूक कळल्यावर त्याने स्वतः आणि डेव्हिड मलानने गोलंदाजी करून फिरकीपटूची उणीव भरून काढली.
दुसऱ्या डावात, तर चक्क जलद गोलंदाज रॉबिन्सनसुध्दा ऑफ स्पिन गोलंदाजी करताना दिसला. इंग्लंडच्या या ७ गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या, पण एक मुख्य फिरकीपटू संघात अलका तर फरक पडला असता.
फलंदाजांची तीच चूक पुन्हा
दुसरी चूक म्हणजे फलंदाज अजूनही चुका सुधारण्याचा प्रयत्न नाही करत आहेत. गॅबा कसोटीत झालेल्या खराब प्रदर्शन ऍडलेडमध्येसुद्धा तसंच राहिलं. कर्णधार जो रूट (Joe Root) आणि डेव्हिड मलान (David Malan) सोडता कोणालाच चांगलं प्रदर्शन करता नाही आलं आहे. दुसऱ्या डावात ४६८ धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे संघ नक्कीच सामना अनिर्णित ठेवण्याचा विचार करणार. पण इंग्लंडचे सगळे फलंदाज इतके बचावात्मक झाले की त्यांनी चौथ्या दिवसाखेरच ४ विकेट्स गमावल्या. खालच्या क्रमातल्या फलंदाजानी थोडी झुंज दिली, मात्र अखेरच्या दिवशी बटलर व्यतिरिक्त अन्य फलंदाज खास काही करताना दिसले नाही.
अँडरसन-ब्रॉडची जोडी फ्लॉप
इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आणि जेम्स अँडरसन (James Anderson) या सामन्यात अपयशी ठरले. जेम्स अँडरसनने पूर्ण सामन्यात ३, तर ब्रॉडने फक्त २ विकेट्स घेतल्या. विकेट्स पार्ट टाईम गोलंदाजांना मिळाल्या यामुळे इंग्लंडची चिंता वाढली आहे. ऍशेसमध्ये खेळलेल्या ४ डावात फक्त एकदाच इंग्लंड ऑस्ट्रेलियाला सर्वबाद करू शकले. त्यामुळे पुढे पुनरागमन करायचं असेल, तर गोलंदाजांना चांगली कामगिरी करावीच लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
टीकांचा धनी ठरलेल्या रुटच्या मदतीला धावला ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
यशस्वी भव! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाला मिळाला ‘मास्टर क्लास’