ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. बुधवारी (26 ऑक्टोबर) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात सुपर 12 फेरीतील सामना खेळला गेला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने आयर्लंडचे आव्हान स्वीकारले. मात्र, पावसाच्या व्यत्ययात खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडला मोठा हादरा बसला. पावसामुळे त्यांना हा सामना डकवर्थ लुईसच्या नियमानुसार अवघ्या 5 धावांनी गमवावा लागला. त्याचबरोबर इंग्लंडच्या नावे आयर्लंडविरुद्ध एक नकोसा विक्रम जमा झाला.
विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या इंग्लंडने या विश्वचषकात अफगाणिस्तानला पराभूत करत विजयी सुरुवात केली होती. दुसऱ्या सामन्यातही त्यांना विजयाची अपेक्षा होती. त्यांनी आयर्लंडला 157 धावांवर रोखण्यात यश मिळवले. मात्र, सुरुवातीच्या फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे ते 14.3 षटकात 105 धावा बनवण्यात यशस्वी ठरले होते. त्याचवेळी आलेल्या पावसामुळे मात्र खेळ थांबवण्यात आला. पावसाचा जोर वाढल्याने खेळ पुन्हा सुरू झाला नाही. अखेरीस डकवर्थ लुईस नियमानुसार पाच धावांनी मागे असल्यामुळे आयर्लंडला विजयी घोषित केले गेले. हा इंग्लंड संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
परंतु, इतिहासात डोकावून पाहिल्यास हे दिसून येते की, इंग्लंड आपले शेजारी असलेल्या आयर्लंडविरुद्ध विश्वचषकात जिंकू शकले नाहीत. 2011 मध्ये भारतीय उपखंडात झालेल्या वनडे विश्वचषकात बेंगलोर येथे इंग्लंड आणि आयर्लंडसमोर आलेले. या सामन्यात इंग्लंडने शानदार फलंदाजी करत 327 धावा उभारल्या होत्या. मात्र, आयर्लंडने केविन ओब्रायनच्या तुफानी शतकाच्या जोरावर हे आव्हान पार केले होते. त्यानंतर आता अकरा वर्षांनी पुन्हा एकदा इंग्लंड संघ आयर्लंडच्या पार जाऊ शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे बापरे, दिनेश कार्तिकच्या वडिलांकडून ऑस्ट्रेलियात नियमाचे उल्लंघन! वाचा सविस्तर
मेलबर्नमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या आयर्लंडचा इंग्लंडला धक्का, सामना 5 धावांनी टाकला खिशात