इंग्लंड क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंची निवृत्ती घेण्याची मालिका सुरूच आहे. अवघ्या चारच दिवसांपूर्वी समाप्त झालेल्या ऍशेस मालिकेनंतर दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड व अष्टपैलू मोईन अली यांनी निवृत्ती जाहीर केलेली. त्यानंतर शुक्रवारी (4 ऑगस्ट) सलामीवीर व 2022 टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य ऍलेक्स हेल्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. मात्र, आपण टी20 लीग खेळत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.
आपल्या संपूर्ण कारकिर्दी दरम्यान अनेक वादांशी नाते राहिलेल्या हेल्स याने निवृत्ती वेळी बोलताना म्हटले,
‘मी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 156 वेळा देशासाठी मैदानावर उतरण्याचा मला मान मिळाला. या काळात मला अनेक मित्र आणि आठवणी मिळाल्या. आता पुढे पाहण्याची हीच योग्य वेळ आहे.’
निवृत्तीच्या पत्रात त्याने विश्वचषक जिंकणे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असल्याचे म्हटले. तसेच, कुटुंब व आपल्या साथीदारांचे आभार व्यक्त केले. तसेच आपण भविष्यात नॉटिंगमशायर तसेच लीग क्रिकेट खेळणार असल्याचे देखील स्पष्ट केले.
त्याने आपल्या कारकिर्दीत इंग्लंडसाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून 156 सामने खेळले. यामध्ये त्याने 5066 धावा केल्या.
(England Opener Alex Hales Annouced Retirement From International Cricket)
महत्त्वाच्या बातम्या-
क्या बात है! विस्फोटक खेळीनंतर तिलकला दक्षिण आफ्रिकेहून कुणी पाठवला व्हिडिओ मेसेज? वाचा बातमी
विंडीजने मोडला भारताचा गर्व! 200व्या सामन्यात रोखला विजयरथ; काय होता 1, 50, 100 अन् 150व्या सामन्याचा निकाल?