इंग्लंड क्रिकेट संघासाठी अनेक इतर देशांचे क्रिकेटपटू आपल्याला क्रिकेट खेळताना दिसतात. कोलपॅक करार अथवा इंग्लंडचा पासपोर्ट असल्याने हे खेळाडू इंग्लंडसाठी खेळण्या करता पात्र होतात. त्यापैकीच एक असलेल्या गॅरी बॅलन्स याने पुन्हा एकदा आता आपल्या मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडसाठी चार वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला बॅलन्स आता झिम्बाब्वेसाठी खेळताना दिसेल. झिम्बाब्वे क्रिकेट संघाने देखील याबाबतची अधिकृत घोषणा केली.
BREAKING NEWS: Gary Ballance set to play for Zimbabwe after agreeing contract
Details 🔽https://t.co/fYiCp08Zvs
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 9, 2022
यॉर्कशायरसाठी काऊंटी क्रिकेट खेळणाऱ्या बॅलन्स याने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाविरुद्ध त्याने सलग दोन सामन्यात शतके झळकावलेली. लॉर्ड्समध्ये त्याने भारताविरुद्ध 110 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर पुढच्याच सामन्यात साउथॅम्प्टनमध्ये 156 धावा करत त्याने खळबळ उडवून दिलेली. तसेच वेस्ट इंडीज विरुद्ध देखील तो शतक झळकावण्यात यशस्वी ठरलेला. 2015 विश्वचषकासाठी देखील त्याचा इंग्लंड संघात समावेश केला गेला होता. त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2017 मध्ये खेळला. आता ययॉर्कशायर संघाने त्याला करारमुक्त केल्यानंतर, पुढील दोन वर्षांसाठी तो झिम्बाब्वेमध्ये खेळताना दिसेल.
बॅलन्सने 23 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये 4 शतकांसह 1498 धावा केल्या आहेत. भारताविरुद्ध 2 शतके झळकावण्याव्यतिरिक्त, 2015 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध सलग 2 शतके झळकावली. बॅलन्सने 7 कसोटी अर्धशतकेही आपल्या नावे केली आहेत. त्याचबरोबर त्याने 16 वनडे सामन्यांच्या 15 डावात 297 धावा केल्या. वनडे क्रिकेटमध्ये त्याची 2 अर्धशतके आहेत. बॅलन्सने 170 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये 41 शतके आणि 55 अर्धशतकांसह 11,876 धावा केल्या. तर 119 लिस्ट ए सामन्यांमध्ये 8 शतके आणि 27 अर्धशतकांसह 4,540 धावा केल्या आहेत. त्याने 100 टी20 सामनेही खेळले असून त्यात 7 अर्धशतकांसह 1807 धावा केल्या आहेत.
(England player Gary Ballance will play for Zimbabwe now)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BANvIND: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा गोलंदाजीचा निर्णय; भारतीय संघात दोन महत्त्वपूर्ण बदल