येत्या काही दिवसात जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) २०२२ (Ipl 2022) स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा ऑक्शन सोहळा पार पडणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये जगभरातील १२०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. दरम्यान या मेगा ऑक्शनपूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डने (ECB) आयपीएल फ्रँचायजींच्या चिंतेत वाढ केली आहे.
आयपीएल २०२२ स्पर्धेतून इंग्लंडचे काही मोठे खेळाडू बाहेर होऊ शकतात. तसेच जे खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत, ते देखील आयपीएल स्पर्धा शेवटच्या टप्प्यात असताना माघार घेऊ शकतात. न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्ड खेळाडूंना मायदेशात बोलावू शकते.
इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना २ जून रोजी लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर पार पडणार आहे. अजूनपर्यंत आयपीएल २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाहीये. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, ही स्पर्धा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचली जाऊ शकते.
एका संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, जर इंग्लंडचे खेळाडू आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत थांबले. तर त्यांना लॉर्ड्सच्या मैदानावर होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात सहभाग घेता येणार नाही. तसेच टी२० क्रिकेट खेळत असल्यामुळे त्यांना लाल चेंडूने सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डने अधिकृतरीत्या कुठलीही माहिती दिली नाहीये. परंतु, त्यांनी असे संकेत दिले आहेत की, आयपीएल फ्रँचायजींनी अंतिम टप्प्यातील सामने इंग्लिश खेळाडूंशिवाय खेळण्याची तयारी ठेवावी.
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी आतापर्यंत २२ खेळाडूंनी नाव नोंदवले आहे. यामध्ये जॉनी बेअरस्टो (Jhonny bairstow) , मार्क वूड, डेविड मलान, ऑली पोप, क्रेग हॉर्टन, सॅम बिलिंग्ज, डेन लॉरेन्स यांसारख्या कसोटीपटूंचा समावेश आहे. तर जोस बटलरला राजस्थान रॉयल्स संघाने रिटेन केले आहे. तर जो रूट (Joe root), बेन स्टोक्स (Ben stokes) आणि ख्रिस वोक्स यांनी आपले नाव मागे घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बापरे, शास्त्री गुरुजी भडकले! म्हणतायेत, “तुम्ही तर भारतीय क्रिकेटचा कणा नाहीसा करताय”
हे नक्की पाहा: