विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. मात्र, या सामन्यानंतर इंग्लंड संघाकडून पदार्पण करून जोरदार कामगिरी करणाऱ्या ओली रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे. पण, इंग्लंड संघातील खेळाडूंन रॉबिन्सला समर्थन दर्शवले आहे.
सन २०१२-२०१३ मध्ये अनेक वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी ट्वीट रॉबिन्सनने केले होते, त्याप्रकरणाची चौकशी इंग्लंड क्रिकेट बोर्ड करत असल्याने ही चौकशी पूर्ण होईपर्यंत रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कारकिर्दीतील पहिलाच कसोटी सामना खेळल्यानंतर रॉबिन्सनवर ही कारवाई झाली आहे. रॉबिन्सनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत ७ गडी बाद केले होते.
न्यूझीलंड संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना झाल्यानंतर रॉबिन्सनने आपल्या चुकीबद्दल माफी देखील मागितली होती. तरीदेखील इंग्लंड क्रिकेट बोर्डने टोकाची भूमिका घेत,त्याला निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
ब्रिटन मीडियासोबत बोलताना, जेम्स अँडरसनने रॉबिन्सनला समर्थन दिले आहे. तसेच तो म्हणाला की, “त्याने सर्वांची माफी मागितली आहे. तुम्ही पाहू शकतात की तो किती निराश होता. एक संघ म्हणून आम्ही त्याचे कौतुक करतो की त्याच्या व्यक्तिमत्त्वात आता बदल झाला आहे. तेव्हापासून तो खूप परिपक्व झाला आहे आणि त्याला संघाचा पूर्ण पाठिंबा आहे.”
तसेच ब्रिटनचे क्रीडामंत्री ओलिवर डाउडेन यांनी देखील ट्विट करत टीका केली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, “रॉबिन्सनने केलेले ट्विट चुकीचे होते. परंतु ही एक दशक पूर्वीची गोष्ट आहे आणि ते ही एका लहान मुलाने लिहिले होते. तोच लहान मुलगा आज एक पुरुष झाला आहे. त्याने आपली चूक मान्य देखील केली आहे. इसीबीने त्याला निलंबित करून खूप कठोर निर्णय घेतला आहे. त्यांनी या गोष्टीवर पुन्हा एकदा विचार करायला हवा.”
महत्त्वाच्या बातम्या –
WTC Final: न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजापासून पुजाराला आहे धोका; आत्तापर्यंत ४ वेळा केलंय बाद
न्यूझीलंड संघासाठी धोक्याची घंटा!! संघातील ‘हे’ २ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे होऊ शकतात संघाबाहेर
आयसीसीकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत २०२०-२१ कसोटी मालिकेचा मोठा गौरव; भारतीय चाहते ऐकून होतील खूश





