---Advertisement---

‘ऍशेस वॉर’ पेटले! आता थेट इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानाच आमनेसामने

---Advertisement---

क्रिकेट विश्वातील एक प्रतिष्ठेची मालिका म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेला ओळखले जाते. सध्या इंग्लंडमध्ये ही मालिका खेळली जात असून पाहुण्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन कसोटीत विजय मिळवले आहेत. क्रिकेटची पंढरी म्हणल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी एक मोठा वाद पाहायला मिळाला. जॉनी बेअरस्टो याला बाद करताना ऑस्ट्रेलिया संघ खिलाडूवृत्ती विसरला असे बोलले जाते. काहींनी ऑस्ट्रेलिया संघावर टीका केली असताना काही जण त्यांना पाठिंबा देखील देत आहेत. अशात आता दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात कॅमेरून ग्रीन गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असलेल्या जॉनी बेअरस्टो याने तो चेंडू सोडला आणि पुढे चालू लागला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ऍलेक्स केरी याने चेंडू हातात आल्यानंतर थेट यष्ट्यांवर फेकला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार अपील केले. मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी बेअरस्टोला बाद घोषित केले.

यामध्ये अनेकांनी ऑस्ट्रेलिया संघाने खिलाडूवृत्ती दाखवत त्याला पुन्हा फलंदाजीला बोलवायला हवे होते असे म्हटले. तर, काहींनी बेजबाबदारपणे क्रिझ बाहेर आलेल्या बेअरस्टोला दोषी घोषित केले.

क्रिकेट इतिहासातील सर्वात जुनी रायवलरी असलेल्या या मालिकेवर दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी पंतप्रधान देखील लक्ष ठेवून आहेत. याप्रकरणी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले,

“झालेली घटना मी पाहिली. ऑस्ट्रेलिया संघाने जी कृती केली ती खेळाच्या खिलाडूवृत्तीचा भाग नाही.”

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍंथनी अल्बानेस यांनी याप्रकरणी आपल्या संघाला भक्कम पाठिंबा दिला. ते म्हणाले,

“संपूर्ण ऑस्ट्रेलिया कर्णधार कमिन्स आणि संघाच्या मागे उभा आहे.”

या सर्व घडामोडींमुळे मालिकेतील उर्वरित तीन सामने देखील आणखी संघर्ष पूर्ण होण्याची शक्यता आहे.

(England PM Rushi Sunak And Australia PM Anthony Albanese React On Ashes)

महत्वाच्या बातम्या –
‘ते दोघे वर्ल्ड कपमध्ये भारताचे हुकमी एक्के’, दिग्गजाने यांच्यावर खेळला दाव 

अफगाणिस्तानच्या प्रमुख खेळाडूचा क्रिकेटमधून तडकाफडकी ब्रेक! वर्ल्डकपआधी संघाला मोठा धक्का

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---