India vs England Test Series 2024: 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेआधीच इंग्लंडचा संघ भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला घाबरलेला दिसत आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसर याने रोहित शर्मा याला फिरकी खेळपट्ट्यांचा डॉन ब्रॅडमन म्हटले आहे. रोहित शर्माला लवकर आऊट करण्यात इंग्लंडचा संघ यशस्वी झाला नाही, तर कसोटी मालिका जिंकण्याची संधी त्यांच्यासाठी नाही, असे पनेसरचे म्हणणे आहे.
2012-13 मध्ये इंग्लंडचा संघ भारतीय भूमीवर मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला होता. या विजयाचे श्रेय मॉन्टी पनेसर (Monty Panesar) आणि ग्रॅम स्वान (Graeme Swann) यांना दिले जाते. मालिकेत 20 विकेट्स घेण्यात स्वान यशस्वी ठरला, तर पनेसरने 17 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, स्वान आणि पानेसरच्या दर्जाचे फिरकीपटू आता इंग्लंडच्या संघात दिसत नाहीत. या कारणामुळे पानेसर यानी इंग्लंड संघाला इशारा दिला आहे. (england scared of rohit sharma before the 5 match test series against india)
पनेसर हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना म्हणाला, “भारतीय फलंदाज वळण घेणाऱ्या चेंडूंवर आक्रमण करणे पसंत करतात. भारतासाठी रोहित शर्मा सर्वात महत्त्वाचा आहे. फिरकी खेळपट्ट्यांवर रोहित शर्मा (Rohit Sharma) डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्यापेक्षा कमी नाही. रोहित शर्माचा रेकॉर्ड अप्रतिम आहे. रोहित शर्माला लवकर बाद करणे हाच भारताला रोखण्याचा एकमेव मार्ग इंग्लंडसमोर आहे.”
पनेसर पुढे म्हणाला, “इंग्लंड संघाला भारतात मालिका जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर प्रत्येक सामन्यात रोहित शर्माला लवकर बाद करावे लागेल. रोहित शर्मा लवकर आऊट झाल्यास भाारतीय संघाला प्लॅन बी स्वीकारावा लागेल. भारताचे युवा फलंदाज दडपणाखाली येतील आणि ही इंग्लंडसाठी चांगली संधी ठरू शकते.”
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका भारत आणि इंग्लंड या दोघांसाठी खूप महत्त्वाची आहे. ही मालिका जिंकण्यात इंग्लंडला यश आले नाही, तर त्यांची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता फार कमी आहे. तशीच परिस्थिती भारताचीही आहे. अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला ही मालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागेल. (England team scared of Rohit Sharma Being compared to Dan Bradman read what exactly is the matter)
हेही वाचा
AUS vs PAK: हसन अलीच्या क्षेत्ररक्षणाची चाहत्यानी उडवली खिल्ली, चिडलेल्या क्रिकेटपटूने दिले चोख उत्तर
T20 World Cup: जर रोहित उपलब्ध असेल तर तुम्ही त्याला वगळू शकत नाही, टी20 विश्वचषकावर माजी दिग्गजाचं विधान