सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे इंग्लंडच्या मालिका जिंकण्याच्या आशा संपल्या आहेत. अशात इंग्लंडचा माजी फलंदाज इयान बेल (ian bell) याने इंग्लंड संघाच्या निवडप्रक्रियेवर (england team selection) प्रश्न उपस्थित केले आहेत.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने जवळपास १०० वर्षांनंतर संघाच्या निवड प्रक्रियेत एक मोठा बदल केला होता. बोर्डने संघाची निवड समिती बरखास्त केली होती. एड स्मिथ हे संघाच्या निवड समितीचे शेवटचे मुख्य निवडकर्ते होते, त्यांनी ही जबाबदारी तीन वर्ष पार पाडली आणि नंतर ते या जबाबदारीतून मुक्त झाले. यानंतर संघाची निवड प्रक्रिया मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड (chris silverwood) यांच्याकडे आली. इंग्लंडचे कर्णधार जो रूट आणि ओएन मॉर्गन खेळाडूंची निवड करण्यासाठी सिल्वरवुड यांची मदत करतात. मात्र, बेलने आता या निवडप्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
बेलच्या मते निवडकर्ता आणि प्रशिक्षक या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच व्यक्तिकडे असल्यामुळे खेळाडू त्यांच्या अडचणी व्यवस्थितपणे सांगू शकत नाहीत. बेल म्हणाला की, “मला निवड समिती बरखास्त करण्याचा निर्णय खूपच कठोर वाटला. सिल्वरवुड मुख्य प्रशिक्षक आणि निवडकर्ता दोन्ही पण आहेत. अशात खेळाडू प्रशिक्षकाला इमानदारीने कसे सांगू शकतो की, मला खेळाच्या या गोष्टीत अडचण येत आहे. कारण, तेच सर्व निर्णय घेणार आहेत.”
इयान बेलने ११८ कसोटी आणि १६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व कले आहे. त्याच्या मते संघाचा निवडकर्ता असा व्यक्ती असायला हवा, जो ड्रेसिंग रूमचा भाग नसेल आणि खेळाडूंशी त्याचा रोजचा संबंध नसेल. तो पुढे बोलताना म्हणाला की, “निवड समितीचा प्रमुख असा असायला हवा, जो ड्रेसिंग रूमच्या बाहेर राहत असेल. तो खेळाडूंची भावनिक दृष्ट्या जोडला गेलेला नसावा किंवा रोज त्यांच्याशी चर्चा करणारा नसावा.”
महत्वाच्या बातम्या –
‘या’ कारणाने रद्द करण्यात आला आशिया चषकातील महत्त्वपूर्ण सामना; क्षणात बदलली उपांत्य फेरीची समीकरणे
‘ही’ आहे कसोटी क्रिकेटमधील २०२१ ची सर्वात फ्लॉप प्लेइंग Xi, जाणून घ्या कोणाला मिळाले कर्णधारपद
द. आफ्रिकेतील वनडे मालिकेसाठी अय्यर आणि धवनमध्ये कोणाला निवडणार निवडकर्ते? पाहा दोघांची आकडेवारी
व्हिडिओ पाहा –