वर्ष २०२१ अनेक दिग्गज क्रिकेटपटूंसाठी वाईट स्वप्नासारखे राहिले आहे. या वर्षभरात काही युवा खेळाडू सुपरहिट ठरले. तर ज्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, ते क्रिकेटपटू फ्लॉप ठरले आहेत. तर काही क्रिकेटपटूंना थेट संघाबाहेर करण्यात आले आहे. तसेच काही खेळाडू आता संघाबाहेर होण्याच्या वाटेवर आहेत. २०२१ मधील सुपरफ्लॉप ठरलेल्या ११ खेळाडूंबद्दल अधिक माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. (Flop 11 of 2021 in test cricket)
१) डॉमिनिक सिब्ले (England) (Dominic Sibley) :
डॉमिनिक सिब्लेने भारतीय संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत ८७ धावांची तुफानी खेळी केली होती. परंतु या खेळीनंतर तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. मायदेशात न्यूझीलंड संघाविरुद्धच्या मालिकेत त्याने २०७ चेंडूंमध्ये त्याने नाबाद ६० धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे सामना अनिर्णीत राहिला होता. संथ गतीने फलंदाजी केल्यामुळे त्याच्यावर टीका देखील झाली होती. कारण या सामन्यात इंग्लंड संघ विजय मिळवू शकला असता. त्यानंतर त्याला संघाबाहेर करण्यात आले होते.
२) मार्कस हॅरीस (ऑस्ट्रेलिया)( Marcus Harris) :
ऑस्ट्रेलियाच्या मार्कस हॅरिससाठी २०२१ चे वर्ष निराशाजनक गेले आहे. सध्याच्या ऍशेस मालिकेतील त्याची कामगिरी पाहता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देणे ही एक मोठी चूक असेल.
३) जॅक क्रॉली (इंग्लंड) (jack Crawley) :
इंग्लंडचा उजव्या हाताचा उंच फलंदाज जॅक क्रॉलीने २०२१ वर्षात १६ डावांमध्ये १०.८ च्या सरासरीने फक्त १७२ धावा केल्या आहेत. संपूर्ण वर्षात त्याने एकच अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे या खेळाडूचा देखील फ्लॉप कसोटी इलव्हेनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
४) रॉस टेलर (Ross Taylor) (England):
न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलरने २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या १० डावांमध्ये केवळ २१३ धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी २३.७ पेक्षा कमी होती. त्याने यावर्षी केवळ एकच अर्धशतक झळकावले. वरिष्ठ खेळाडू म्हणून त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.
५) अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) (भारत ):
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे यावर्षी पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने २१.७ च्या सरासरीने केवळ ४५१ धावा केल्या आहेत. खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याच्याकडून कसोटी उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. परंतु फ्लॉप कसोटी प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला कर्णधारपद देण्यात आले आहे.
६) जोस बटलर (Jose Buttler) (इंग्लंड) :
इंग्लंड संघाचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर देखील यावर्षी पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. तसेच इंग्लंड संघाची कामगिरी देखील निराशाजनक राहिली आहे. जोस बटलरने यावर्षी २४.९ च्या सरासरीने ३४८ धावा केल्या आहेत.
७) वियान मल्डर (Wiaan Mulder) (दक्षिण अफ्रीका) :
दक्षिण आफ्रिका संघातील हा खेळाडू देखील २०२१ मध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने यावर्षी खेळलेल्या ६ डावात अवघ्या ९३ धावा केल्या आहेत.
८) सॅम करण (Sam Curran) (इंग्लंड) :
इंग्लंड संघातील हा युवा अष्टपैलू खेळाडू २०२१ मध्ये संघर्ष करताना दिसून आला आहे. हेच कारण आहे की, तो वर्षात पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.
९) यासिर शाह (Yasir shah) (पाकिस्तान) :
यावर्षी लेगस्पिनर यासिर शाहने पाकिस्तानी चाहत्यांना निराश केले आहे. यावर्षी त्याला सहा डावात केवळ ८ गडी बाद करण्यात यश आले.
१०) स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) (इंग्लंड) :
इंग्लंड संघाचा दिग्गज खेळाडू स्टुअर्ट ब्रॉड कडून देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु तो देखील पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने यावर्षी १३ डावात ३९.५ च्या सरासरीने केवळ १२ गडी बाद केले आहेत. हेच मुख्य कारण आहे की, स्टुअर्ट ब्रॉडचा फ्लॉप इलेव्हेनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
११) शनन गॅब्रियल (Shanan gebriyal) (वेस्ट इंडिज):
वेस्ट इंडिज संघाचा वेगवान गोलंदाज शनन गॅब्रियल देखील यावर्षी पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने १२ डावात ४६.८ च्या सरासरीने ११ गडी बाद केले आहेत. हेच कारण आहे की, त्याचा फ्लॉप इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
द. आफ्रिकेतील वनडे मालिकेसाठी अय्यर आणि धवनमध्ये कोणाला निवडणार निवडकर्ते? पाहा दोघांची आकडेवारी
बंगलोरला हरवून ‘टॉप फोर’मध्ये स्थान मिळवण्याचे चेन्नईयनचे लक्ष्य