क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जाते. कारण कोणत्या क्रिकेट सामन्यात काय होऊ शकतं सांगता येत नाही. कधी एखादा गोलंदाज विचित्र पद्धतीने चेंडू टाकतो, कधी फलंदाज आगळावेगळा फटका मारतो, तर कधी क्षेत्ररक्षक त्यांच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांना थक्क करून टाकतात. एक असाच व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये फलंदाजाने असा काही शॉट मारला आहे की, चाहते पूर्णपणे गोंधळात पडले आहेत. हा शॉट नेमका बॅक स्कुप आहे की स्प्यॅरो शॉट आहे? याच गोंधळात सगळे पडले आहेत. हा शॉट नेमका कोणता आहे? हे शोधण्यात सगळे चाहते दंग झाले आहेत. कुणीतरी या शॉटला बॅक स्कुप म्हणत आहेत, तर कुणी बिहाईंड द फ्लिक म्हणत आहेत.
क्रिकेटविश्वात असे अनेक दिग्गज फलंदाज आहेत जे आपल्या वेगळ्या शॉट्ससाठी ओळखले जातात. तसे पाहिले तर महेंद्रसिंह धोनीचा हेलिकॉप्टर शॉट, सचिन तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह हे शॉट्स चाहत्यांची मने जिंकतात. पण हा आगळावेगळा शॉट चाहत्यांना पूर्णतः गोंधळात टाकून गेलेला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, हा प्रसंग एका स्थानिक क्रिकेट सामन्यामध्ये घडला आहे. यात गोलंदाज चेंडू टाकतो आणि फलंदाज आपल्या पायाचा मुव्ह बदलून ऑफ साइडला जातो, नी बॉल पूर्णतः स्विंग होऊन स्टंपच्या मध्ये घुसत आहे. यावेळी फलंदाजाने पायाच्या पाठीमागे बॅट घेऊन उलट शॉट मारला आहे. या अनोख्या शॉटवर फलंदाजाला चौकार तर मिळाला नाही, परंतु त्याला एक धाव मात्र नक्कीच मिळाली आहे.
What a remarkable shot! What would you name it? ???? pic.twitter.com/vCJNQXeWmm
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) December 27, 2021
चाहते या शॉट्सला वेगवेगळी नावे देताना दिसत आहेत. कुणी या शॉटला स्पॅरो शॉट म्हणत आहे, तर कुणी बिहाइंड द फ्लिक म्हणत आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला चाहते आपापल्या परीने नावं सुचवत आहेत. हा व्हिडिओ गावदेवी अंजुर क्रिकेट क्लबने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून टाकला आहे. व्हिडिओमध्ये असा टॅगही दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
द. आफ्रिकेतील वनडे मालिकेसाठी अय्यर आणि धवनमध्ये कोणाला निवडणार निवडकर्ते? पाहा दोघांची आकडेवारी
अभिमानास्पद! प्रशिक्षक द्रविडने निभावली परंपरा, ‘या’ खास पद्धतीने सुरू केला चौथ्या दिवसाचा खेळ
बंगलोरला हरवून ‘टॉप फोर’मध्ये स्थान मिळवण्याचे चेन्नईयनचे लक्ष्य