तब्बल 17 वर्षानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने यजमान संघाचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. इंग्लंड संघासाठी युवा फलंदाज हॅरी ब्रुक याने शानदार कामगिरी केली. त्याला दुसऱ्या सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित केले गेले. त्याचवेळी सामना संपल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने ब्रुक याचे कौतुक केले.
मुलतान येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने चौथ्या दिवशी 26 धावांनी विजय संपादन केला. इंग्लंडसाठी कसोटीच्या दुसऱ्या डावात वेगवान शतक ठोकत हॅरी ब्रुक याने मोठा हातभार लावला होता. तसेच त्याने पहिल्या कसोटीतही केवळ 80 चेंडूवर शतक झळकावलेले. त्याच्या याच कामगिरीनंतर संघाचा कर्णधार बेन स्टोक्स हा त्याचे कौतुक करताना थकत नव्हता. स्टोक्सने आपल्या या 23 वर्षीय फलंदाजाचे कौतुक करताना म्हटले,
“त्याच्यामध्ये ठासून प्रतिभा भरलेली आहे. त्याची फलंदाजीची शैली एकदम सरळ आणि सुस्पष्ट वाटते. त्यामुळेच तो क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात यशस्वी होऊ शकतो.”
स्टोक्सने त्याचे कौतुक करताना त्याची तुलना थेट भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीशी केली. तो म्हणाला,
“ब्रुक अशा मोजक्या खेळाडूंमध्ये आहे जे क्रिकेटच्या तीनही प्रकारात सहभागी होऊ शकतात. तसेच, त्यांना तिथे यशही मिळू शकते. विराट कोहली देखील त्यापैकीच एक आहे. हे बोलणे थोडे घाईचे ठरेल. मात्र, तो संघावर थेट दबाव टाकू शकतो.”
हॅरी ब्रुक याने सप्टेंबर महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर 7 सामन्यांची टी20 मालिका खेळली होती. या मालिकेतही त्याने शानदार कामगिरी करताना मालिकावीराचा पुरस्कार आपल्या नावे केला होता. तसेच, टी20 विश्वचषकाच्या उपांत्य व अंतिम फेरीत याची कामगिरी दखल घेण्यासारखी झालेली.
(Ben Stokes Compare Harry Brook With Virat Kohli)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशान किशनमुळे ‘या’ भारतीय फलंदाजाचे नुकसान, वसीम जाफरने व्यक्त केले मत
धोनीचा ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहत्याने वापरली ‘ही’ अनोखी पद्धत, सुंदर व्हिडिओ होतोय व्हायरल