पहिले दोन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचा वाढलेला आत्मविश्वास हेडिंग्ले कसोटी सामन्यात इंग्लंडने कमी केला. तिसरा सामना इंग्लंडने 3 विकेट्सने जिंकला. या सामन्यातही रोमांचकतेची हद्द पार झाली. कधी सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला, तर कधी इंग्लंडचे पारडे सामन्यात जड दिसले. सन 2019प्रमाणे ऍशेस मालिका 2023 मधील तिसरा सामनाही वर्षोनुवर्षे आठवणीत ठेवला जाईल. हा सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. चला तर, तो काय म्हणाला जाणून घेऊयात…
भांड्यात पडलेला स्टोक्सचा जीव!
बेन स्टोक्स (Ben Stokes) याने सामन्यानंतर खुलासा करत म्हटले की, “मी खोटे बोलणार नाही. शेवटी मी थोडा चिंतेत होतो. आम्हाला माहिती होते की, ऍशेस मालिकेत कायम राहण्यासाठी आम्हाला हा सामना जिंकणे खूपच गरजेचे आहे. मी अखेरच्या अर्ध्या तासात हेडिंग्लेच्या ड्रेसिंग रूममध्ये जवळपास 2 किलोमीटर चाललो. वास्तवात मी शेवटच्या 20 धावा बनताना पाहिल्याच नाहीत. ती एकदम वेगळी स्थिती असते, जेव्हा तुम्ही काहीच करू शकत नसता.”
पुढे बोलताना स्टोक्स म्हणाला की, “तुम्ही फक्त पाहू शकता आणि आशा करता की, गोष्टी तुमच्यानुसार होतील. या सामन्याच्या सुरुवातीपूर्वी ऍशेस मालिका पाहता संघाचे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील प्रदर्शन शानदार राहिले आहे.”
ब्रूकची केली प्रशंसा
स्टोक्सने दुसऱ्या डावात इंग्लंडसाठी महत्त्वपूर्ण 75 धावांची खेळी साकारणाऱ्या हॅरी ब्रूक (Harry Brook) याचेही कौतुक केले. तो म्हणाला की, “हॅरी ब्रूक खूपच चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडे खूप प्रतिभा आहे. मला वाटते की, आम्ही त्याला त्याची प्रतिभा दाखवण्याची पूर्ण संधी दिली आहे.”
अखेरच्या क्षणाचा रोमांच
खरं तर, इंग्लंडला विजयासाठी 20 धावांची गरज होती. मात्र, मिचेल स्टार्क याने सेट झालेला फलंदाज ब्रूक याला तंबूच्या दिशेने चालतं केलं. ब्रूक बाद होताच इंग्लंड संघाची चिंता वाढली. मात्र, ख्रिस वोक्स (नाबाद 32) आणि मार्क वूड (नाबाद 16) यांनी मिळून इंग्लंडला विजय मिळवून दिला.
उभय संघातील पुढील सामना 19 जुलै ते 23 जुलैदरम्यान मॅनचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात पार पडणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ पुरेपूर प्रयत्न करतील. (england skipper ben stokes told that he is very nervous in last minutes of headingley test of ashes 2023 know why)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजमध्ये नेहमीच तळपते मराठमोळ्या अजिंक्यची बॅट, आतापर्यंतचा रेकॉर्ड 140 कोटी भारतीयांची मान उंचावणारा
‘बिल्कुल नाही, ऑस्ट्रेलियाला या पराभवाचा…’, इंग्लंडविरुद्ध हारताच कमिन्सचे मोठे विधान, लगेच वाचा