---Advertisement---

स्टिव्ह स्मिथचा टी20 प्रवास सुसाट, बीबीएलनंतर आता ‘या’ लीगमध्ये खेळणार

On: मंगळवार, फेब्रुवारी 3, 2026 6:22 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा कसोटी स्पेशालिस्ट स्टिव्ह स्मिथ बिग बॅश लीगनंतर (बीबीएल) आणखी एका टी२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. तो आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार आहे. त्याला सियालकोट स्टॅलियन्सने २०२६च्या हंगामासाठी करारबद्ध केले आहे.

स्मिथला ऑक्शनआधीच करारबद्ध केल्याचे समजते. पीएसएलचे नियम पाहिले तर प्रत्येक फ्रॅंचायजी जो एकदाही या लीगमध्ये खेळला नाही अशा कोणत्याही एका विदेशी खेळाडूला थेट करारबद्ध करू शकते. यामुळे स्मिथ पहिल्यांदाच पीएसएलमध्ये खेळताना दिसणार आहे.

स्मिथ कदाचित सियालकोटचे नेतृत्वही करू शकतो. त्याने बीबीएलमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळताना उत्तम कामगिरी केली होती. त्याने २०२५-२६च्या त्या हंगामातील ५ सामन्यात ५९.८०च्या सरासरीने २९९ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये तो सिडनी सिक्सर्सकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. ज्यामुळे संघ अंतिम फेरीत पोहचला मात्र पर्थ स्कॉचर्सकडून पराभूत झाला.

स्मिथ इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे, मात्र २०२५च्या ऑक्शनमध्ये तो अनसोल्ड राहिला. तरीही त्याने निराश न होता टी२० क्रिकेट खेळणे सुरू ठेवत वेगवेगळ्या टी२० लीग खेळत राहिला. त्याने आतापर्यंत २७२ टी२० सामने खेळले असून ६२४२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ५ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ५४ विकेट्सही घेतल्या आहेत.

स्मिथ आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पुणे वॉरियर्स, राजस्थान रॉयल्स, रायजिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोची टस्कर्स केरला या संघाकडून खेळला आहे. याबरोबरच तो कॅरिबियन प्रीमियर लीग, बांग्लादेश प्रीमियर लीग, मेजर लीग क्रिकेट आणि द हंड्रेड या लीगमध्ये खेळला आहे. याआधी त्याला मेजर लीग क्रिकेटच्या वॉशिंग्टन फ्रीडमनेही करारबद्ध केले.

पीएसएल २६ मार्चपासून सुरू होणार आहे. तसेच सियालकोटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनला मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---