---Advertisement---

दिग्गज म्हणतोय, या गोलंदाजांमध्ये दिसतोय वकार, वसीमची आक्रमकता

---Advertisement---

मुंबई । क्रिकेटच्या इतिहासाकडे पाहिले असता जागतिक क्रिकेटमध्ये नेहमीच पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व असते. पाकिस्तान क्रिकेट संघाने या खेळास सर्वोत्कृष्ट गोलंदाजांना देण्याचे काम केले आहे. 80-90 च्या दशकात पाकिस्तानने जागतिक क्रिकेटला अनेक धोकादायक गोलंदाज दिले, ज्यात वसीम अक्रम, वकार युनूस, इम्रान खान आणि शोएब अख्तर यांची नावे आहेत. सध्याच्या घडीला पाकिस्तानचे फलंदाज स्वत: ला सिद्ध करण्यात अपयशी ठरले असले तरी जागतिक क्रिकेटमध्ये चमकदार गोलंदाज देण्यासाठी पाकिस्तान चांगले काम करत आहे.

सध्या पाकिस्तानचा संघ कसोटी आणि टी -२० मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला आहे, जिथे मालिकेचा पहिला कसोटी सामना दोन्ही देशांमधील मॅनचेस्टरमध्ये खेळला जात आहे. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने पाकिस्तानच्या दोन गोलंदाजांची नावे सांगितली आहेत जे की वकार युनूस आणि वसीम अक्रम यासारखी संघात भूमिका बजावत आहेत.

पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा संघ 2 फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरला आहे. मायकेल वॉन क्रिकबझवर याबद्दल आपले मत व्यक्त केले. त्याने नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी या युवा वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले आणि असे सांगितले की, ते संघाचा पुढील वकार युनूस आणि वसीम अक्रम असल्याचे सिद्ध करू शकतात.

क्रिकबझशी बोलताना तो म्हणाला, ”मिसबाह इंग्लंडविरुद्ध दोन फिरकीपटूंसह का खेळू इच्छित आहे हे मला समजले आहे. ज्या मार्गाने तो चालू आहे परंतु अद्याप त्यांच्याकडे मोहम्मद अब्बास, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी आहेत. ते खूपच उच्च दर्जाचे गोलंदाज आहे. येणाऱ्या पाच वर्षांत गोलंदाजांची ही जोडगोळ वकार युनूस आणि वसीम अक्रम यांच्या सारखी भूमिका बजावताना दिसून येतील.”

मायकल वॉन पुढे म्हणाला की, “नसीम शहासारख्या प्रतिभावान खेळाडूला पदार्पण करताना मी पाहिले आहे. त्यामुळे मी स्वत: ला भाग्यवान समजतो. तो एक उत्तम गोलंदाज आहे. शाहिन आफ्रिदी दिवसेन दिवस चांगला खेळाडू होत अाहे. मोहम्मद अब्बासचे चेंडू फलंदाजाला अडचणीत आणणारे आहेत.”

दुसरीकडे, पाकिस्तानचे प्रशिक्षक आणि निवडकर्ता मिस्बाह-उल-हक देखील नसीम शाहची स्तुती करताना दिसले आणि आपल्याला हा गोलंदाज कसा सापडला हे सांगितले.

तो म्हणाला, ”वकार युनूस आणि मी त्याला (नसीम) नुकताच गद्दाफी स्टेडियमवर पाहिले आणि तो पूर्ण गोलंदाजासारखा दिसत होता. आम्ही निर्णय घेतला आहे की तो प्रथम श्रेणी खेळत नाही, तरीही त्याने ऑस्ट्रेलियाला जावे. तिथे पोहोचल्यावर त्याने चार सामने खेळले आणि 17 गडी बाद केले. आम्ही संभाव्यता पाहू शकतो, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पुरावा आम्हाला आढळला. त्याच्याकडे यापूर्वी हॅटट्रिक आणि पाच विकेट हॉल आहेत. तो स्वतःच्या हिमंतीवर कसोटी सामने जिंकू शकतो.”

महत्त्वाच्या बातम्या – 

५ वर्षांपुर्वी बेन स्टोक्सने टाकलेल्या ‘त्या’ एका चेंडूची जगाने घेतली दखल

किंग्ज इलेव्हन पंजाबचा हुकमी एक्का आहे हा क्रिकेटर; भारतीय मुलीशी केलाय साखरपुडा

४७० मिनीटं पीचवर तळ ठोकून त्याने २४ वर्ष जुना विक्रम मोडला

ट्रेंडिंग लेख – 

क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज

या ५ घटनांवेळी भारतीय क्रिकेटपटू आपले अश्रू रोखू शकले नाहीत

भारताचे ५ असे मोहरे, ज्यांनी वनडे व कसोटीत घेतल्यात प्रत्येकी २००पेक्षा जास्त विकेट्स

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---