इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात येत्या ८ जुलैपासून मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघातील ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ज्यामध्ये इंग्लंड संघातील ३ क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफमधील ४ सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय संघातील सदस्यांना देखील अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
पाकिस्तान संघाविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपुर्वी बीसीसीआयने सराव सामना खेळू देण्याची मागणी केली होती. या मागणीला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानेही होकार दिला होता. (England squad memebers test covid entire team in isolation)
परंतु आता इंग्लंडचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या महत्त्वपुर्ण सराव सामन्यावर रद्द होण्याचे सावट परसले आहे. कोरोनाच्या शिरकावानंतर ईसीबीने बीसीसीआयला आगामी कसोटी मालिकेसंदर्भात माहिती दिली आहे. भलेही इंग्लंडचे खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडले, मात्र इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात कसलाही बदल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. परंतु तत्पुर्वीच्या भारतीय संघाच्या सराव सामन्यासंदर्भात ते विचार करत असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे या मोठ्या मालिकेपूर्वी हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, ईसीबी त्यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना बायो बबलमध्ये येण्याची आणि भारतीय संघाविरुद्ध सराव सामना खेळण्याची अनुमती देणार की नाही?
भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर २० दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. येत्या १४ जुलैला सर्व भारतीय क्रिकेटपटू लंडनमध्ये एकत्र येणार आहेत. डरहममध्ये भारतीय संघाचे २ आठवडा सराव शिबिर असणार आहे. जर ईसीबीने होकार दिला तर सराव सामना येत्या काही दिवसांतच खेळवला जाईल.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला सराव सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. ज्याचा परिणाम अंतिम सामन्यात दिसून आला होता. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाला इंग्लंड संघाविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची संधी मिळाली होती. ज्यामुळे न्यूझीलंड संघाचे पारडे या सामन्यात जड होते. हा सामना न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून जिंकला होता.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्वाच्या बातम्या-
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन ‘त्यांनी’ गांगुलीला रडवले
सुट्टीवर असलेल्या बुमराह अन् संजनाने लुटला युरो कप सेमीफायनलचा आनंद, पाहा व्हायरल फोटो
‘दुसऱ्या दर्जाचा संघ नाही, तर धवनसेनेत बलाढ्य संघांनाही धोबीपछाड देण्याची ताकद’