वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा भारतात पार पडणार आहे. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रकही समोर आले आहे. यावेळी क्रिकेटच्या महासंग्रामात 10 संघ सहभाग घेत आहेत. वनडे विश्वचषक 2019 स्पर्धेचे ट्रॉफी इंग्लंड संघाने जिंकली होती. त्यावेळी त्यांनी अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभवाचा धक्का दिला होता. अशात विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर विश्वचषक खेळण्यासाठी तयार झाला आहे.
आर्चर विश्वचषकासाठी तयार
इंग्लंड संघाला 2019च्या वनडे विश्वचषकाची ट्रॉफी जिंकून देण्यात जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याने सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने वनडे विश्वचषक 2019च्या 11 सामन्यात 20 विकेट्स चटकावल्या होत्या. मात्र, कोपराच्या दुखापतीमुळे तो तब्बल 2 वर्षे क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्यानंतर त्याने पुनरागमन करत 2023मध्ये इंग्लंडसाठी 4 वनडे आणि 3 टी20 सामने खेळले. त्यानंतर त्याने मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएल 2023 हंगामात 5 सामने खेळत 2 विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये कोपराची दुखापत त्रास देऊ लागल्यानंतर त्याला इंग्लंड संघाने माघारी बोलावले होते.
प्रशिक्षकाचे विधान
ससेक्स संघाचे प्रशिक्षक पॉल फारब्रेस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “जोफ्रा आर्चर ठीक आहे. मला वाटते की, विश्वचषक खेळण्यासाठी तो पूर्णपणे तयार आहे. जर इंग्लंड संघ पुढील ऍशेस मालिकेत त्याला घेऊन जायचे असेल, तर त्यांना हे पाहावे लागेल की, आर्चरकडून सर्वोत्तम प्रदर्शन कशाप्रकारे करून घेतले जाऊ शकते.”
Could we see Jofra Archer at #CWC23? 👀
Latest on the England pacer's fitness 👇https://t.co/8exckmCGrT
— ICC (@ICC) July 27, 2023
तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळलाय आर्चर
जोफ्रा आर्चर याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो सन 2021नंतर कोणताही कसोटी सामना खेळला नाहीये. त्याच्या अनुपस्थितीत मार्क वूड आणि ख्रिस वोक्स यांसारख्या खेळाडूंनी इंग्लंडसाठी शानदार कामगिरी केली आहे. आर्चर इंग्लंड संघाकडून तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळला आहे. त्याने 13 कसोटीत 42 विकेट्स, 21 वनडेत 42 विकेट्स आणि 15 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. (england star pacer jofra archer fit in time for odi world cup 2023 cricket team read)
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिज मालिका एवढी महत्त्वाची आहे तरी का? कॅप्टन रोहितने सांगितलं मोठं कारण
कसोटीनंतर वनडेतही 100 टक्के तळपणार विराटची बॅट, असं आम्ही नाही ‘ही’ लाजवाब आकडेवारी सांगतेय