भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान शुक्रवारी सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचे बिगुल वाजले आहे. मालिकेच्या आधी उभय संघांतील खेळाडू व क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दोन्ही संघातील खेळाडूंचा विलगीकरण कालावधी संपुष्टात आला आहे. तसेच, सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी देखील नकारात्मक आली.
ईसीबीने केली घोषणा
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने अधिकृतरित्या इंग्लंड संघातील सर्व खेळाडू विलगीकरणातून बाहेर आले असल्याचे सांगितले आहे. इसीबीने स्पष्ट केले आहे की, ‘सोमवारी (१ फेब्रुवारी) इंग्लंड संघातील खेळाडूंचा विलगीकरण कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे सर्व खेळाडू आता सरावासाठी उपलब्ध असतील. तसेच खेळाडूंची कोरोना चाचणी देखील निगेटिव आली आहे. मंगळवारी संपूर्ण संघ सराव करताना दिसेल.’
यापूर्वी भारतात दाखल झालेले बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर व रॉरी बर्न्स यांनी दोन दिवस आधी सरावास सुरुवात केली होती. हे तिन्ही खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत इंग्लंड संघाचा भाग नव्हते. इंग्लडचा संघ भारतात चार कसोटी, पाच टी२० व तीन वनडे सामने खेळेल.
पहिल्या दोन कसोटीसाठी भारताचा संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल
पहिल्या दोन कसोटीसाठी इंग्लडचा संघ-
जो रूट (कर्णधार), जॅक क्राउली, डेनियल लॉरेंस, डॉमिनिक सिबली, मोइन अली, बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, रॉरी बर्न्स, जोस बटलर, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर, जेम्स एंडरसन, डॉमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, ओली स्टोन
महत्वाच्या बातम्या:
पहिल्या कसोटीतील विजयाने हुरळून जाऊ नका, पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी खेळाडूंना केले सावध
माजी यष्टीरक्षकाने दिल्या भारतीय संघाला कानपिचक्या, म्हणाला
रवी शास्त्री यांनी भारतीय संघात, रमीज राजा यांचे मोठे वक्तव्य