दक्षिण आफ्रिकेने इंग्ललंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकी संघाने विजय मिळवलला. या मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णयक सामन्यात आफ्रिकेचा गोलंदाज तबरेझ शम्सीच्या धारदार गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज नतमस्तक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या डावखुऱ्या फिरकीपटूने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना २४ धावांत ५ बळी घेतले. यामुळे दक्षिण आफ्रिकेने तिसरा टी-२० सामना ९० धावांनी जिंकला. यासह संघाने ३ सामन्यांची मालिका २-१ अशी खिशात घातली.
या सामन्यात प्रथम खेळताना दक्षिण आफ्रिकेने ५ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लिश संघ १६.४ षटकांत १०१ धावांवर गारद झाला. यावेळली इंग्लंडचे ७ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. या मालिकेतील पहिला सामना यजमान इंग्लंडने जिंकला असला तरी शेवटचे दोन सामने जिंकून आफ्रिकेने शानदार पुनरागमन केले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाची सुरुवात चांगली झाली. संघाची धावसंख्या बिनबाद २८ धावा होती. चौथ्या षटकात कर्णधार जोस बटलर १० चेंडूत ४ धावा काढून डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजला बळी पडला. यानंतर दुसरा सलामीवीर फलंदाज जेसन रॉय १७ आणि डेव्हिड मलान ७ धावा करून बाद झाला. अशा प्रकारे संघाची धावसंख्या ३ विकेटवर ५२ धावा झाली.
बेअरस्टो वगळता सर्व अपयशी ठरले
यानंतर जॉनी बेअरस्टोशिवाय इंग्लंडचा एकही फलंदाज संघर्ष करू शकला नाही. बेअरस्टोने ३० चेंडूत २७ धावा केल्या. तोही महाराजांच्या चेंडूवर आऊट झाला. त्याचवेळी मोईन अली ३, लियाम लिव्हिंगस्टोन ३ आणि सॅम करन ९ धावा करून बाद झाले. ख्रिस जॉर्डनने १४ धावा केल्या. तबरेझ शम्सीने ४ षटकात केवळ २४ धावा दिल्या आणि ५ बळी घेतले. त्याच्या ११ चेंडूत एकही धाव झाली नाही. महाराजांनीही २ बळी घेतले. उत्कृष्ट कामगिरीसाठी शम्सीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
हेंड्रिक्स आणि मार्करामचे अर्धशतक
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक पहिल्याच षटकात खाते न उघडता बाद झाला. यानंतर रीझा हेंड्रिक्स आणि रिले रोसो यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. रोसो १८ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. यानंतर हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करत चांगला पाया रचला. हेंड्रिक्सने ५० चेंडूत ७० धावा केल्या. ९ चौकार मारले. त्याचवेळी मार्कराम ३६ चेंडूत ५१ धावा करून नाबाद राहिला. शेवटी कर्णधार डेव्हिड मिलरने ९ चेंडूत २२ धावा केल्या. इंग्लंडकडून डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने ४ षटकात २४ धावा देत ३ बळी घेतले. हेंड्रिक्सला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘राष्ट्रकुल’ क्रिडा स्पर्धेचा इतिहास माहितीये?, जाणून घ्या एका क्लिकवर
भारतासाठी तिसऱ्या खेळाडूने रचली ‘सुवर्ण’गाथा, जिंकले कॉमनवेल्थ २०२२ मधील सहावे पदक
‘…म्हणून रसल आता फक्त केकेआरसाठीच खेळणार’, खुद्द सीईओंनी केलं स्पष्ट