भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या संघासोबत वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत पंत उपस्थित नव्हता, परंतु उभय संघातील टी-२० मालिकेसाठी तो संघासोबत जोडला गेला आहे. एकदिवसीय मालिकेत भारताने जयमान संघाला ०-३ अशा अंतराने पराभूत केले आणि आता टी-२० मालिकेतही भारताने ०-१ अशी आघाडी घेतली. अशातच भारताचे माजी स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग प्रशिक्षक शंकर बसू यांनी पंतसोबतच्या एका जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) याने सध्या भारतीय संघात स्वतःचे नियमित स्थान बनवले आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे. आज जरी पंतला सर्वजण ओखळत असतील, तरी माजी प्रशिक्षक शंकर बसू (Shanker Basu) यांची आणि त्याची भेट तेव्हाच झाली होती, जेव्हा पंत स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत होता. निदहास ट्रॉफीदरम्यान या दोघांमध्ये चर्चा झाली होती.
बसू यांच्या मते पंत एक तुफानी फलंदाज, उत्कृष्ट यष्टीरक्षक, कर्णधार आणि नवीन विक्रम करणारा खेळाडू आहे. पंत मैदानात नेहमीच चर्चेत असतो. यष्टीपाठी उभा असताना पंत गोलंदाजाला ज्या पद्धतीने इशारा करतो, ते देखील मजेशीर असते. पंत क्रिकेटपटू सोबतच एक चांगला एथलीट म्हणजेच चपळ खेळाडू आहे, असे त्यांना वाटते.
यूट्यूवर रणवीर अल्लाहबादिया याच्या चॅनलवर बोलतान शंकर बसू म्हणाले की, “मी श्रीलंकेत रिषभ पंतला पाहिले होते, हे मला आठवते. तो निदहास ट्रॉफी आणि वेस्ट इंडीज दौऱ्याच्या आधी संघात आला होता. मला लक्षात आहे, निदहास ट्रॉफीत मी जेव्हा त्याला भेटलो आणि त्याला म्हटलो होतो की, तो एक जिमनास्ट (चपळ खेळाडू) आहे. कृपया त्याच्या प्रशिक्षकाला फोन कर आणि धन्यवाद म्हण. माझ्या या विधानामुळे तो आश्चर्यचकित झाला होता. ‘काय?’, अशी त्यांची त्याची प्रतिक्रिया होती.”
दरम्यान, पंतच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने भारतासाठी ३१ कसोटी, २७ एकदिवसीय आणि ५१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. या तिन्ही प्रकारांमध्ये त्याने अनुक्रमे २१२३, ८४० आणि ७८२ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारतासाठी तिसऱ्या खेळाडूने रचली ‘सुवर्ण’गाथा, जिंकले कॉमनवेल्थ २०२२ मधील सहावे पदक
‘राष्ट्रकुल’ क्रिडा स्पर्धेचा इतिहास माहितीये?, जाणून घ्या एका क्लिकवर
कॉमनवेल्थमध्ये भारताला आणखी एक ‘सुवर्ण’संधी! इतिहास रचत ‘हा’ खेळाडू मिळवणार गोल्ड मेडल




