---Advertisement---

त्या जबरा फॅनचे मैदानावरुन ‘असे’ आभार मानत इंग्लंडने जिंकली सर्वांची मने, बघा व्हिडिओ

On: बुधवार, जानेवारी 27, 2021 10:49 AM
---Advertisement---

श्रीलंका आणि इंग्लंड संघादरम्यान नुकतीच 2 कसोटी सामन्यांची मालिका पार पडली आहे. गॉल येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने उत्तम कामगिरी करत श्रीलंकेचा 6 विकेटने पराभव केला. मात्र, ही मालिका क्रिकेट बरोबरच चर्चेत राहिली ती इंग्लंडच्या एका चाहत्यासाठी.

इंग्लंडच्या रॉब लुईस नामक समर्थकाने तब्बल दहा महिने श्रीलंकेला राहत इंग्लंडच्या सामन्याची वाट बघितली होती. मात्र, कोरोनामुळे त्याला मैदानात येऊन सामना बघणे शक्य झाले नाही. यादरम्यान त्याला गॉल किल्ल्यावर जाऊन काही वेळ बॅनर फडकवण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे रॉबने इंग्लंड संघाला किल्ल्यावरुन समर्थन दिले होते. याबद्दल इंग्लंड संघातील खेळाडूंनी सामना संपल्यानंतर रॉबचे आभार मानले आहेत.

दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर इंग्लंडच्या सर्व खेळाडूंनी सीमारेषेजवळ येत टाळ्या वाजवून लुईसचे आभार मानले. यावेळी मालिका विजयाचा आनंद लुईसच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियात देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रुटने केला लुईसला फोन 

इंग्लंडचा कर्णधार जो रुटने पहिला सामना संपल्यानंतरही लुईसला फोन लावत त्याचे आभार मानले होते. रूट फोनवर म्हणाला होता, “तुला स्टेडियम शेजारच्या किल्ल्यावर बघून निश्चितच आनंद झाला. मी सर्व संघाच्यावतीने तुझे आभार मानण्यासाठी आलो आहे. तु वर्षभर जो प्रवास करत संघाला सपोर्ट केला त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत.”

रुट पुढे म्हणाला होता, “हा विजय तुझ्यासोबत साजरा करणे संपूर्ण संघासाठी आनंददायी आहे. मला आशा आहे की आमच्या कामगिरीने तुला आनंद मिळाला असेल. पुन्हा एकदा तुझ्या पाठिंबा देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. ”

लुईसने इंग्लंडचा सामना बघण्यासाठी मागील तब्बल दहा महिने श्रीलंकेत वास्तव्य केले होते. मार्च 2019 मध्ये इंग्लंडचा श्रीलंका दौरा निश्‍चित झाला होता, मात्र कोरोनामुळे तो पुढे ढकलण्यात आला. या कठीण परिस्थितीतही संघाला सपोर्ट करण्यासाठी रॉबने श्रीलंकेत राहण्याचा निर्णय घेतला होता. लुईसच्या या क्रिकेट प्रेमाचे संपूर्ण क्रिकेटविश्वाकडून कौतुक केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-अरेरे..! तब्बल दहा महिने श्रीलंकेत इंग्लंडच्या खेळण्याची वाट बघणाऱ्या प्रेक्षकाला हकलवले स्टेडियमबाहेर, जाणून घ्या कारण

ऑस्ट्रेलियात ‘या’ गोष्टीचा फलंदाजी करताना झाला कायदा, वॉशिंग्टन सुंदरची प्रतिक्रिया

“भारताविरुद्ध सलामी करणार का?,” डीकवेल्लाचा डॉम सिब्लीला प्रश्न, पाहा मजेशीर व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---