भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एक लज्जास्पद विक्रमाची नोंद झाली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच एखाद्या संघाने 300 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
याआधी इंग्लंडच्याच संघाने विराटच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम होता. इंग्लंडने, 2018 मध्ये लॉर्ड्स कसोटीत भारताविरुद्ध पहिल्या डावाच्या आधारे 289 धावांची आघाडी घेतली होती. लीड्स कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी इंग्लंडने त्यांचाच विक्रम मोडीत काढला आहे. इंग्लंडकडे दुसऱ्या दिवसाखेर आता 345 धावांची आघाडी आहे.
लीड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या जोरावर भारताला पिछाडीवर लोटले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 23 वे शतक साजरे केले आहे, शतक करण्यासाठी त्याने 124 चेंडूंचा सामना केला. या मालिकेतील त्याचे हे तिसरे शतक आहे. रूटने 165 चेंडूत 121 धावा केल्या आणि बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत केले.
इंग्लंडने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाखेर 8 विकेट गमावून 423 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारावर इंग्लंड भारतापेक्षा 345 धावांनी पुढे आहे. तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात भारताला 78 धावांवर बाद केले होते. इंग्लडच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे भारतीय संघावर शंभरीच्या आत सर्वबाद होण्याची नामुष्की ओढावली आहे.
कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांना निराश केले आहे, तो अवघ्या 7 धावा करून माघारी वळला. लॉर्ड्स कसोटीत शतक करणारा केएल राहुल भोपळाही न फोडता बाद झाला. दुसरीकडे चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. रोहित शर्मा(19) आणि अजिंक्य रहाणे(18) यांनी काही काळ खेळपट्टीवर तग धरण्याचा प्रयत्न केला, पण तेही अपयशी ठरले. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…
जगातील आजपर्यंतच्या सर्वश्रेष्ठ क्रिकेटरबद्दल १० माहित नसलेल्या गोष्टी
‘माझी वक्तव्ये वाईट अजेंडासाठी वापरु नका’, त्या वादामुळे भारताचा ‘गोल्डन बॉय’ भडकला; वाचा सविस्तर






