---Advertisement---

गतविजेती इंग्लंडची टीम जशीतशी सुपर 8 साठी पात्र, पुढील वाटचाल मात्र अवघड; जाणून घ्या

On: रविवार, जून 16, 2024 12:35 PM
---Advertisement---

इंग्लंड क्रिकेट संघने यंदाच्या टी20 विश्वचषकात सुपर-8 मध्ये आपले स्थान निश्चित केला आहे. रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलिया स्काॅटलंड यांच्या अटीतटीच्या सामन्यात कांगारुनी शानदार विजय मिळवला, त्यांच्या विजयानंतर इंग्लंड सुपर-8 पात्र ठरला. आता इंग्लंडचा सामना दक्षिण अफ्रीका,अमेरिका आणि यजमान वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे. इंग्लंडचा सुपर-8 मधील पहिला सामना 20 जून रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध खेळणार आहे.

वास्तविक, इंग्लंड टी20 विश्वचषक 2024 च्या ‘ब’ गटात आहे. या गटात ऑस्ट्रेलिया आधीच सुपर-8 पात्र झाली होती. यानंतर इंग्लंड किंवा स्काॅटलंड संघाला पुढे जायचे होते. स्काॅटलंडने 4 सामने खेळला आहे. ज्यापेकी 2 सामने जिंकाला आहे, ज्यामध्ये 5 गूणांसह त्यांचे नेट रनरेट +1.255 आहे. तर दुसरीकडे इंग्लंड संघही 4 सामने खेळला आहे ज्यापैकी 2 जिंकले आहेत. त्यांच्या कडे देखील 5 गूण आहेत पण नेट रनरेट च्याबाबतीत इंग्लंड संघ पुढे असल्याने सुपर-8 साठी पात्र ठरला. त्यांचे नेट रनरेट +3.611 आहे.

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज  20 जून रोजी पहिला सामना होईल तर 21 जून रोजी दक्षिण अफ्रीका इंग्लंड आमने सामने असतील तर सुपर-8 मधील शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध अमेरिका सामना होणार आहे.

टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 साठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान एकाच गटात आहेत. यामध्ये बांगलादेश किंवा नेदरलँडलाही प्रवेश मिळेल. दुसऱ्या गटात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. सुपर8 पूर्वी टीम इंडिया ‘अ’ गटात होती. त्याने चारपैकी तीन सामने जिंकले होते आणि एक रद्द झाला होता. भारताबरोबरच अमेरिकेनेही ‘अ’ गटातून सुपर-8 साठी पात्रता मिळवली आहे.

महत्तवाच्या बातम्या-

ठरलं! गौतम गंभीरच असणार भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक, या दिवशी होणार घोषणा
फलंदाजीसह दोन्ही हातांनी करतो गोलंदाजी! या अनोख्या खेळाडूची बीसीसीआयनं घेतली दखल
2007 चा योगायोग 2024 मध्येही घडला! आता टीम इंडिया नक्कीच बनणार चॅम्पियन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---