ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सध्या केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंड संघ या सामन्यावर वर्चस्व गाजवताना दिसतोय. त्याचवेळी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाने केलेल्या एका कृतीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाने खास जर्सी घातलेल्या दिसून आल्या. सर्वांनी एक दुसऱ्याच्या नावाच्या जर्सी घातल्या होत्या. कर्णधार बेन स्टोक्स याची जर्सी जॉनी बेअरस्टो याने परिधान केलेली. तर, जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांनी एक दुसऱ्याच्या जर्सी परिधान केलेल्या. याप्रमाणेच इतर खेळाडूंनी देखील आपापली जर्सी दुसऱ्याला दिलेली. त्यांचे असे करण्यामागे एक सामाजिक कारण होते.
सध्या जगभरात अनेक व्यक्तींना डेमेथिया आजाराने ग्रासले आहे. या आजाराने ग्रस्त व्यक्ती आपल्या दैनंदिन कामातील अनेक गोष्टी विसरताना दिसतात. उदाहरणार्थ, कपडे कोणती घालायची. सांगितलेले काम लक्षात न राहणे यांचा यामध्ये समावेश होतो. अशाच व्यक्तींना पाठिंबा देण्यासाठी इंग्लंड संघाने दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी एक दुसऱ्याची जर्सी परिधान केली. यानंतर सोशल मीडियावर इंग्लंड संघाचे चांगलेच कौतुक होत आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी केली. झॅक क्राऊली व बेन डकेट यांनी संघाला 79 धावांची सलामी दिली. क्राऊली याने आक्रमक अर्धशतक झळकावले. डकेट व त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी 42 धावा केल्या. ब्रूक 7 धावांवर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा जो रूट व बेअरस्टो यांनी अर्धशतके करत इंग्लंडचे आघाडी 300 पार नेली आहे.
(England Team Wore Changed Jersey For Support Dementia Patients At Oval Test)
महत्वाच्या बातम्या –
हार्दिकच्या कसोटी खेळण्यावरून दोन भारतीय दिग्गज भिडले, वाचा काय घडले
WIvsIND । विराटकडून धोनीच्या विक्रमाला तडा जाणार? यादीत रोहित सर्वोच्च स्थानी