---Advertisement---

कसोटी मालिकेपूर्वी संघाला मोठा धक्का, कर्णधार गंभीर जखमी

---Advertisement---

नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत श्रीलंकेने टीम इंडियाचा धुव्वा उडवत 2-0 वनडे मालिकेवर कब्जा केला. आता भारताला विरुद्धची मोहीम उरकल्यावर श्रीलंका संघ इंग्लंड दाैरा करणार आहे. म्हणजेच इंग्लंड क्रिकेट संघ या महिन्यात श्रीलंकेसोबत कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे. आता या कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, द हंड्रेड लीगमध्ये रविवारी (11 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या मँचेस्टर ओरिजिनल्स आणि नॉर्दर्न सुपरचार्जर्स यांच्यातील सामन्यादरम्यान बेन स्टोक्सला दुखापत झाली.

त्यानंतर स्टोक्सला मैदानाबाहेर जावे लागले होते. आता सिटी स्कॅननंतर असे समोर आले आहे की, स्टोक्सला त्याच्या डाव्या बाजूच्या हॅमस्ट्रिंगमध्ये दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो संपूर्ण उन्हाळ्यात म्हणजे संपूर्ण हंगामात किंवा उर्वरित वर्षभर देखील बाहेर असु शकतो. या मालिकेत श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेचाही समावेश आहे. म्हणजेच इंग्लंडसाठी हा मोठा धक्का आहे. आता स्टोक्सच्या जागी ऑली पोप संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

श्रीलंकेसोबतच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑली पोपला इंग्लंड संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते, मात्र आता कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर या मालिकेत आता ओली पोपच इंग्लिश संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. याचा अर्थ आगामी मालिकेत पोपसाठी आव्हान असू शकते. कारण एकदिवसीय मालिकेत भारताला पराभूत केल्यानंतर या श्रीलंकेच्या संघाचे मनोबल उंचावले आहे.

भारतासोबत टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर आता श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. याशिवाय दुसरा सामना 29 तारखेला तर तिसरा सामना 6 सप्टेंबरला होणार आहे.

हेही वाचा-

भारत वि. बांगलादेश सामन्याचे ठिकाण बदलले, ‘या’ स्टेडियममध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय मॅच होणार
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताला कराव्या लागणार ‘या’ सुधारणा?
विनेशला रौप्य पदकासाठी करावी लागणार प्रतिक्षा, ‘या’ दिवशी होणार निर्णय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---