विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी (29 ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंड हे संघ समोरासमोर आले. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने भारताला 229 पर्यंत रोखले. या धावांचा बचाव करताना भारताला जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी शानदार सुरुवात करून देत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. या दोघांनी इंग्लंडचे चार फलंदाज पहिल्या 10 षटकातच तंबूत पाठवले.
CWC2023. WICKET! 9.1: Jonny Bairstow 14(23) b Mohammad Shami, England 39/4 https://t.co/Jki6Vd2GY0 #INDvENG #CWC23
— BCCI (@BCCI) October 29, 2023
विजयासाठी केवळ 230 धावांचे आव्हान मिळालेले असताना इंग्लंड संघाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. डेव्हिड मलान व जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या चार षटकातच 30 धावा उभारून इंग्लंडला चांगली सुरुवात दिली. मात्र, पाचव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या जसप्रीत बुमराह याने पाचव्या चेंडूवर मलान याचा त्रिफळा उडवला. तर, अखेरच्या चेंडूवर जो रूट पायचित झाला.
त्यानंतर आठव्या षटकात मोहम्मद शमी याने बेन स्टोक्स याला चांगलेच सतावले. त्यानंतर त्याने अखेरचा चेंडूवर त्याचा त्रिफळा उध्वस्त करत इंग्लंडला संकटात टाकले. त्यानंतर दहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शमीने बेअरस्टोला बाद करून इंग्लंडला जास्त संकटात टाकले. इंग्लंड संघ पहिल्या दहा षटकात 4 बाद 40 धावा करू शकला. यादरम्यान शमी व बुमराह यांनी प्रत्येकी एक निर्धाव षटक टाकले
(England Top Order Collapsed Against India Bumrah And Shami Shines)
महत्वाच्या बातम्या –
‘आमच्याही संघात जर स्कॉट एडवर्ड्ससारखा…’, नेदरलँड्सच्या विजय पाहून मोठी गोष्ट बोलला विंडीजचा दिग्गज
“रोहित स्वतःसाठी खेळला असता तर…”, गंभीरच्या त्या विधानाने उंचावल्या भुवया