भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी (25 जुलै) 2023-24 दरम्यान मायदेशात होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले. यानुसार एकूण 16 आंतरराष्ट्रीय सामने भारतीय संघ मार्च 2024 पर्यंत खेळणार आहे. वेळापत्रकातील सर्वात महत्त्वाची मालिका आहे ती भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका आहे.
यावर्षी भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) आयसीसी वनडे विश्वचषकाचे (ICC ODI WC 2023) यजमानपद भूषवणार आहेत. वनडे विश्वचषकासोबत महत्वाच्या द्विपक्षीय मालिकांचेही यजमानपद बीसीसीआयकडे आहे. वनडे विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका होईल. तर, वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान टी20 मालिका होईल.
त्यानंतर, इंग्लंडचा संघ सामन्यांची मोठी कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येईल. या मालिकेला 25 जानेवारी रोजी हैदराबाद येथे सुरूवात होईल. त्यानंतर 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान विजाग येथे दुसरी कसोटी खेळली जाईल. तिसरी कसोटी 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या दरम्यान राजकोट येथे पार पडेल. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी रांची येथे तिसऱ्या कसोटीला सुरुवात होईल. तर, अखेरची कसोटी 7 मार्च ते 11 मार्च रोजी धर्मशाला येथे खेळला जाईल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची असेल. इंग्लंड संघ भारतात 2011 नंतर एकही कसोटी मालिका जिंकला नाही. मात्र, आता इंग्लंड ज्याप्रकारे बॅझबॉल क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे ते यावेळी विजयाचा प्रयत्न करतील.
(England Tour India In 2024 No Matches At Mumbai And Eden Gardens)
महत्वाच्या बातम्या –
“रोहित-विराटची शतके काय कामाची?”, गावसकरांनी निवडसमितीला विचारले धारदार प्रश्न
नव्या हंगामासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर! मुंबई-पुण्याला नाही मिळाले यजमानपद