नाॅटिंगघम | भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लंचब्रेक झाल्यावर भारताची धावसंख्या 3 बाद 82 धावा अशी आहे.
दोन कसोटी सामने झाल्यावर भारतीय सलामीवीरांनी आज चांगली सुरूवात केली. अर्धशतकी भागादारी रचत शिखर धवनने 7 चौकाराच्या मदतीने 35 आणि के एल राहूल 23 धावा करत बाद झाले.
धवन आणि राहूल यांनी केलेली 60 धावांची ही भागीदारी या कसोटी मालिकेतील भारताची सर्वोच्च् भागीदारी ठरली. याआधी विराट कोहली आणि उमेश यादव या दोघांनी दुसऱ्या कसोटीत 57 धावांची भागीदारी केली होती.
तिसऱ्या क्रमांकावर आलेला चेतेश्वर पुजाराही फक्त 14 धावा करत बाद झाला. भारताच्या या तीनही विकेट्स ख्रिस वोक्सने घेतल्या आहेत.
सध्या खेळपट्टीवर कर्णधार विराट कोहली 4 धावांवर नाबाद आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–रिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील
–कसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी