मुंबई । रविवारी साऊथॅम्प्टन येथे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला दुसरा टी -20 सामना डेव्हिड वॉर्नरसाठी वाईट ठरला. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यासह, मागील आठ वर्षात आणि 49 व्या डावात प्रथमच तो टी -20 सामन्यात शून्य धावसंख्येवर बाद झाला.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजीला उतरला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने पहिल्या षटकातील तिसर्या चेंडूवर पहिला धक्का दिला. त्याने डेव्हिड वॉर्नरला खातेही उघडण्याची संधी दिली नाही. वॉर्नर 49 डावांनंतर पहिल्यांदा टी -20 सामन्यात शून्यावर बाद झाला. यापुर्वी डेविड वॉर्नर टी२०मध्ये २७ मार्च २०१२ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध शुन्य धावेवर बाद झाला होता. त्यानंतर तो कालपर्यंत कधीही शुन्यावर बाद झाला नव्हता.
जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने दुसर्या टी -20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-0 अशी आघाडी घेतली. रविवारी (6 सप्टेंबर रोजी) झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित षटकांत 157 धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लंडने हे लक्ष्य सात चेंडूत राखून पार केले.
England are off to a 🔥 start!
They have dismissed Warner and Carey in the first two overs 💥💥 #ENGvAUS SCORECARD ▶️ https://t.co/TlFZ6oWvsKpic.twitter.com/lDtF5PV54o
— ICC (@ICC) September 6, 2020
पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडने पहिल्या टी -20 सामन्यात केवळ दोन धावांनी विजय मिळवला होता. डेव्हिड मलानचे (66) अर्धशतक आणि लेगस्पिनर आदिल रशीद आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर हा विजय मिळवला.