बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडने सर्वबाद 287 धावा केल्या आहेत.
गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला. इंग्लंडने बुधवारी पहिल्या दिवसाखेर 9 बाद 285 धावा केल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी इंग्लंडला 2 धावा जोडता आल्या.
इंग्लंडकडून या डावात कर्णधार जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी अर्धशतक केले. रुटने या डावात 156 चेंडूत 9 चौकारांच्या सहाय्याने 80 धावा केल्या. तर बेअरस्टोने 88 चेंडूत 70 धावा केल्या. यात त्याने 9 चौकार मारले.
इंग्लंडच्या अन्य फलंदाजांपैकी फक्त केटन जेनिंग्जने थोडीफार रुटला साथ दिली. मात्र तोही 42 धावांवर असताना बाद झाला. अन्य फलंदाजांपैकी अॅलिस्टर कूक(13), डेव्हिड मलानही(8), बेन स्टोक्स(21), आदिल रशीद(13),स्टुअर्ट ब्रॉड(1), सॅम करन(24) आणि जेम्स अँडरसन(2*) यांनी धावा केल्या. तर जॉस बटलर शून्यावर बाद झाला.
भारताकडून या डावात आर अश्विनने 62 धावात सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच अन्य गोलंदाजांपैकी मोहम्मद शमी(3/64), उमेश यादव (1/56) आणि इशांत शर्मा(1/46) यांनी विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक:
इंग्लंड पहिला डाव: सर्वबाद 287 धावा
(इंग्लंड- जो रुट-80 धावा, जॉनी बेअरस्टो-70 धावा; भारत- आर अश्विन-4/62 , मोहम्मद शमी-3/64)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–तीन दिग्गज भारतीय माजी क्रिकेटपटू इम्रान खानच्या शपथ विधीला लावणार हजेरी
–पहिल्या सामन्यातच दडलाय भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा निकाल