भारताचा युवा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सोमवारी (२३ जुलै) २८ वर्षाचा झाला.
चहलला त्याच्या वाढदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसहित अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या.
मात्र यामधील हिटमॅन रोहित शर्माने चहलला दिलेल्या शुभेच्छा सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला.
रोहित शर्माने ट्विटरवरुन युजवेंद्र चहलला वाढदिवसाच्या गमतीशीर शुभच्छा देत त्याची खिल्ली उडवली.
“माझ्या लहान भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येत्या काळात तुझ्या फिरकीच्या जोरावर तु सर्वांना प्रभावित करशील. मला आशा आहे की तुझा हरवलेला दात लवकरच सापडेल.” चहलला शुभेच्छा देताना रोहित आपल्या ट्विटमध्ये असे म्हणाला.
Wish you a great birthday little bro, may you continue to spin everyone into your web and impress one and all. And hope you find that missing tooth 🤨 @yuzi_chahal . Much love RS pic.twitter.com/FnbyxaVhOt
— Rohit Sharma (@ImRo45) July 23, 2018
सध्या रोहित शर्मा आणि चहल भारताच्या टी-२० अाणि एकदिवसीय संघाचे नियमीत सदस्स आहेत. तसेच आयपीएलमध्ये सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणारा चहल पूर्वी मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे.
यामुळे रोहित शर्मा आणि चहलची चांगली मैत्री आहे. हे दोन्ही क्रिकेटपटू ट्विटरवरुन कायम एकमेकांविषयी मजेशीर ट्विट करत असतात.
महत्त्वाच्या बातम्या-
-टीम इंडियाला मोठा धक्का! हा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर?
-जेम्स अॅंडरसनचा कर्णधार विराट कोहलीवर आरोप