---Advertisement---

एक नंबर विकेट! मयंकचा ‘रॉकेट थ्रो’ अन् रिषभची चपळता, इंग्लंडचा मोठा फलंदाज दुर्देवीरित्या धावबाद

On: मंगळवार, सप्टेंबर 7, 2021 1:09 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात द केनिंग्टन ओव्हल स्टेडियम, लंडन येथे पार पडलेला चौथा कसोटी सामना रोमहर्षक ठरला. पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात सांघिक प्रदर्शन करत १५७ धावांनी इंग्लंडचा धुव्वा उडवला. दरम्यान सबस्टिट्यूट क्षेत्ररक्षक म्हणून आलेल्या भारतीय खेळाडूंनीही संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यातही मयंक अगरवाल याचा ‘रॉकेट थ्रो’ सामन्याचे आकर्षण ठरला. 

भारताच्या ३६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १०० धावांवर रॉरी बर्न्सच्या रुपात संघाला पहिली विकेट मिळाली होती. त्यानंतर इंग्लंडचा सलामीवीर हसीब हमीद आणि डेविड मलान संघाचा डाव पुढे नेत होते. रविंद्र जडेजाच्या डावातील ५४ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हमीदने कव्हर पाँईटच्या दिशेने बचावात्मक शॉट खेळला. चेंडू बॅटला लागताच नॉन स्ट्राईकवर असलेला मलान ताबडतोब एक धाव घेण्यासाठी पळाला. हे पाहून हमीदलाही मजबूरीने धाव घ्यावी लागली.

इतक्यात कव्हर पाँईटवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या मयंकने वेगाने चेंडू पकडला आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या दिशेने भिरकावला. पंतनेही त्वरित चेंडू पकडला आणि यष्टीला मारला. हे सर्व इतक्या वेगाने घडले की, तोवर नॉन स्ट्राईकवरील मलान आपली धाव पूर्ण शकला नाही. परिणामी तो धावबाद झाला. मयंकचा रॉकेट थ्रो आणि पंतची चपळता यामुळे भारतीय संघाला मलानच्या रुपात मोठी विकेट मिळाली. तो ३३ चेंडूंमध्ये अवघ्या ५ धावा करत पव्हेलियनला परतला.

https://twitter.com/NextBiIIionairs/status/1434844629271072772?s=20

https://twitter.com/127Oval/status/1434844473603747845?s=20

मयंक आणि पंतच्या या कामगिरीचे सोशल मीडियावर तोंडभरुन कौतुक होत आहे. मलाननंतर हमीद, ओली पोप, जॉनी बेयरस्टो, मोईन अली हे इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने जो रुटच्या रुपात संघाला मोठे यश मिळवून दिले. परिणामी केवळ २१० धावांवर इंग्लंडचा आख्खा संघ सर्वबाद झाला.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1434844217004548106?s=20

पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या दुखापतीमुळे मयंकच्या जागी केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. राहुलने ही संधी दोन्ही हातांनी घट्ट पकडत शतकी कामगिरी केली आणि संघातील आपले स्थान पक्के केले. यामुळे मयंकला दुखापतीतून सावरल्यानंतरही बाकावरच बसून राहावे लागले आहे. ४ सामने संपल्यानंतर शेवटच्या पाचव्या कसोटी सामन्यातही त्याला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रबळ आत्मविश्वास… ‘त्याने’ स्वत:हून गोलंदाजी मागितली अन् मोठ्या विकेट्सही घेतल्या, कोहलीचा उलगडा

शार्दुलच्या अष्टपैलू कामगिरीचा धुरळा! गेल्या ५२ वर्षांत ‘ही’ अद्भुत कामगिरी करणारा दुसराच भारतीय

विराटचे ‘मास्टरक्लास’ नेतृत्त्व! कसोटीच्या पहिल्या डावात २०० हून कमी धावा करुनही दुसऱ्यांदा अद्भुत विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---