कार्डीफ। भारतीय संघ गुरवारी, 6 जुलैला इंग्लंड विरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला काही खास विक्रम करण्याची संधी आहे.
धोनीला आज जर 11 जणांच्या भारतीय संघात संधी मिळाली तर हा त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 500वा सामना ठरणार आहे. तो 23 डिसेंबर 2004 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
त्यानंतर त्याने भारताकडून 90 कसोटी, 315 वनडे आणि 91 टी20 सामने खेळले. तसेच त्याने आशिया संघाकडून 3 वनडे सामने खेळला आहेत. असे मिळून धोनीने आत्तापर्यंत 499 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
भारताच्या आत्तापर्यंत फक्त सचिन तेंडूलकर आणि राहुल द्रविड या खेळाडूंनी 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
याबरोबरच धोनीला या सामन्यात आणखी 3 विक्रम करण्याचीही संधी आहे-
-आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये धोनीला 50 षटकार पुर्ण करण्यासाठी फक्त 3 षटकारांची गरज आहे. सध्या त्याने 91 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 47 षटकार मारले आहेत.
आत्तापर्यंत भारताच्या फक्त 3 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 50 पेक्षा जास्त षटकार मारले आहेत. यात रोहित शर्मा(84 षटकार), युवराज सिंग(74 षटकार) आणि सुरेश रैना(57 षटकार) हे खेळाडू आहेत.
-याबरोबरच धोनीने जर आज 45 धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 1500 धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार करेल.
धोनीने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 91 सामन्यात खेळताना 79 डावात 36.37च्या सरासरीने 1455 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
-कॅप्टनकूल धोनीला या सामन्यात यष्टीमागे 50 झेल पूर्ण करण्याचीही संधी आहे. यासाठी त्याला फक्त एका झेलची आवश्यकता आहे. जर त्याने यष्टीमागे 50 झेल पूर्ण केले तर तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये यष्टीमागे 50 झेल घेणारा पहिलाच यष्टीरक्षक ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-Breaking- जखमी जसप्रीत बुमराह ऐवजी मुंबईकर खेळाडूला इंग्लंडविरुद्ध वनडेत संधी
-सुरेश रैनाला आज एबी डेविलियर्सला मागे टाकण्याची संधी
-असं काय झालं की २६व्या वर्षीच क्रिकेटपटूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय