---Advertisement---

जॉनी बेअरस्टोला शिव्या देणं पडलं महागात, आयर्लंडच्या क्रिकेटवर पहा काय झाली कारवाई

On: मंगळवार, ऑगस्ट 4, 2020 4:17 PM
---Advertisement---

मुंबई । इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात वनडे मालिका खेळली जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेच्या शेवटच्या सामन्याआधी आयर्लंड क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोश लिटल याला इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले. तसेच त्याच्या खात्यात एका डिमेरिट गुणांची नोंद झाली आहे.

दुसर्‍या सामन्यादरम्यान जोश लिटलने इंग्लंडच्या डावातील 16 व्या षटकात जॉनी बेअरस्टोला बाद करून त्याच्याविरुद्ध चुकीची भाषा वापरली. यामुळे, लिटिलवर आयसीसी आचारसंहितेच्या कलम  2.5 चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. जोश लिटलने मॅच रेफ्री समोर त्याच्याकडून चूक झाल्याची कबुली दिली आहे.

इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात साऊथॅम्प्टन येथे 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात असून यामध्ये इंग्लंडच्या संघाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या दोघांमधील मालिकेचा शेवटचा सामना मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. या मालिकेदरम्यान आयर्लंडकडून पदार्पण करणारा अष्टपैलू केम्फरने खूप प्रभावित केले. त्याने पहिल्या दोन्ही सामन्यात अर्धशतक झळकावले आणि इंग्लंडविरुद्ध विकेटही घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---