न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील पहिला सामना इंग्लंडने ५ विकेट्सने जिंकला. आता मालिकेतील दुसरा सामना ट्रेंटब्रिजमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेलने शतक ठोकले, जे त्याचे न्यूझीलंड संघासाठी सलग दुसरे शतक आहे. खास बाब म्हणजे मिचेलचे वडील यांचा इंग्लंडशी खास संबंध आहे आणि त्याच देशाच्या क्रिकेट संघाविरुद्ध मिचेलने सलग दुसरे शतक ठोकले आहे.
उभय संघातील या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात ५५३ धावा उभ्या केल्या. यामध्ये त्यांचा मध्यक्रमातील फलंदाज डॅरिल मिचेल (Darly Mitchell) याने १९० धावांचे योगदान दिले. मिचेलचे हे कसोटी कारकिर्दीतल एकंदरीत तिसरे शतक ठरले, तर सलग दुसरे शतक देखील ठरले. इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेचा पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये दुसऱ्या डावात मिचेलने १०८ धावा केल्या होत्या.
मिचेल इंग्लंडमध्ये सलग दोन डावांमध्ये शतकी खेळी करणारा न्यूझीलंडचा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या बेवन कॉन्गडनने १९७३ मध्ये इंग्लंडविरुद्ध सलग दोन डावांमध्ये १७६ आणि १७५ धावा ठोकल्या होत्या. तसेच ही कामगिरी करणारा दुसरा न्यूझीलंडचा खेळाडू ठरले होते विक पोलार्ड. त्यांनीही १९७३ मध्येच इंग्लंडविरुद्धच्या सलग दोन डावांमध्ये १०८ आणि १०२ धावा केल्या होत्या. आता या दिग्गजांच्या यादीत डॅरिल मिचेल नव्याने सहभागी झाला आहे.
Unstoppable @dazmitchell47 💯#WTC23 | #ENGvNZ | https://t.co/2h7KnwbegI pic.twitter.com/iOI60WhI8q
— ICC (@ICC) June 11, 2022
मिचेलने २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने अर्धशतकी खेळी करून पदार्पण स्मरणीय बनवले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याची फलंदाजी करण्याची वेळ आली नव्हती. त्याच्या कसोटी पदार्पणाची खास बाब ही ठरली होती की, त्याचे वडील त्यावेळी इंग्लंडच्या रग्बी संघाचे प्रशिक्षक होते. त्याचे वडील आगोदर न्यूझीलंडसाठी रग्बी खेळले आणि नंतर स्वतःच्या संघाला प्रशिक्षण देखील दिले होते. इंग्लंड संघासोबत कार्यरत असताना त्यांचा मुलगा डॅरिलने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करून उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. आता याच इंग्लंड संघाविरुद्ध मिचेलने सलग दोन डावांमध्ये शतकी खेळी करून दाखवली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकट्या ब्रावोसाठी मुकेश अंबानींनी का पाठवलेलं स्वत:चं प्रायव्हेट जेट? जाणून घ्या एका क्लिकवर
‘त्या’मुळे आयपीएलची पहिली कमाई वडिलांच्या हाती सोपवली, मुंबईकर तिलकच्या निर्णयामागे कौतुकास्पद कारण
हद्दच केली! भारत-दक्षिण आफ्रिकेतील सामन्यादरम्यान स्टॅन्ड्समध्ये चाहत्यांची हाणामारी, Video चर्चेत