---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा नवा कसोटी कर्णधार

---Advertisement---

काही कौटुंबिक कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी कर्णधार फाफ डुप्लेसीने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये माघार घेतली असून नवीन कर्णधार म्हणून डीन एल्गारची निवड झाली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये आफ्रिकेचा नेतृत्व करणार तो एकूण ३६वा कर्णधार ठरणार आहे तर १९९२ मध्ये आफ्रिकेवरील बंदी उठवल्यांनंतरचा तो केवळ १२ वा कसोटी कर्णधार आहे.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होत असून त्यात एल्गार आफ्रिकेचा तर जो रूट इंग्लंडचा कर्णधार असेल.

एल्गारने आफ्रिकेकडून ३५ कसोटी सामन्यांत ३९.२५च्या सरासरीने २००२ धावा केल्या आहेत. तसेच या ३० वर्षीय खेळाडूने १३ विकेट्सही घेतल्या आहेत.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर ६ जून पासून सुरु होत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment