आयपीएल 2025 स्पर्धेतील 26 वा सामना आज 12 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स संघात एकाना स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनऊ संघाचा कर्णधार ऋषभ पंतने गोलंदाजीचा निर्णय घेऊन गुजरातला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. गुजरातने फलंदाजी करताना 180 धावा केल्या तसेच लखनऊला जिंकण्यासाठी 181 धावांचे आव्हान दिले आहे.
गुजरातसाठी कर्णधार शुभमन गिल याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 38 चेंडूत 60 धावा केल्या. त्याचबरोबर शुबमन गिलने 6 चौकार आणि 1 षटकार झळकावले आहे. त्याच्यानंतर साई सुदर्शनने चांगली कामगिरी केली आहे. त्याने 37 चेंडूत 56 धावा केल्या.
लखनौसाठी शार्दुल ठाकूरने 4 षटकांत 34 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. रवि बिश्नोईने देखील 2 व विकेट्स घेतल्या. आता लखनौ संघ हे आव्हान पूर्ण करू शकतो की नाही? ही पाहणे मनोरंजक ठरणार आहे.






