---Advertisement---

शेन वॉर्न म्हणतो, ‘हा’ खेळाडू करिअरच्या शेवटपर्यंत घेईल ७०० कसोटी विकेट्स

On: गुरूवार, जुलै 30, 2020 3:43 PM
---Advertisement---

मॅनचेस्टर येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात इंग्लंडच्या विजयात वेगवान गोलंदाज स्टुअर्ड ब्रॉडने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्याने १० विकेट्सबरोबरच फलंदाजी करताना केवळ ३३ चेंडूत अर्धशतकी खेळीही केली. त्याच्या या कामगिरीमुळे सचिन तेंडुलकरनंतर आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्नने ब्रॉडची प्रशंंसा केला आहे.

मॅनचेस्टर कसोटीत ब्रॉडने (Stuart Broad) कसोटी कारकिर्दीत आपल्या ५०० विकेट्स पूर्ण केल्या. तो ५०० कसोटी विकेट्सचा टप्पा पार करणारा जगातील ७वा गोलंदाज ठरला तर वेगवान गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रा व कर्टनी वॉल्शनंतरचा चौथा गोलंदाज ठरला. तसेच इंग्लंडकडून कसोटीत ५०० विकेट्स घेणारा तो जेम्स अँडरसन नंतरचाही दुसराच गोलंदाज ठरला. यावर वॉर्नने (Shane Warne) म्हटले की ब्रॉडकडे ७०० विकेट्स घेण्याची संधी आहे.

वॉर्नने ट्वीट केले, “विजय मिळविल्याबद्दल आणि ३४ वर्षांच्या वयात ५०० विकेट्स घेतल्याबद्दल अभिनंदन. ७०० पेक्षा अधिक विकेट्स घेण्याची संधी आहे.”

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा ‘फिरकीचा जादूगार’ मुथय्या मुरलीधरन (८००) पहिल्या क्रमांकावर आहे, तर वॉर्न (708) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

यापूर्वी सचिननेही ब्रॉडची प्रशंसा केली होती. तसेच त्याने ब्रॉडला ५०० विकेट्स घेण्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या.

ब्रॉडला पहिल्या कसोटीत अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळाले नव्हते. तरीही दुसऱ्या कसोटीत त्याला संधी मिळाल्यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन केले.

महत्त्वाच्या बातम्या-

-भर सामन्यात बेन स्टोक्सकडून घडले असे काही; रूटलाही आवरले नाही हसू

-स्टुअर्ट ब्रॉडमुळे जसप्रीत बुमराहचे झाले नुकसान; आयसीसी क्रमवारीत बसला झटका

-इंग्लंडने वेस्ट इंडीजचा पराभव केल्यानंतर जेसन होल्डरने यासाठी भारताकडे मागितली मदत

ट्रेंडिंग लेख-

-१४ वर्षे झाली तरीही तो विश्वविक्रम आहे जयवर्धने-संगकारा जोडीच्या नावावर

-आयपीएल २०२० मध्ये हे ५ मोठे विक्रम मोडण्याची शक्यता…

-आयपीएल २०२० – प्रत्येक संघाकडे असणारा एक परदेशी खेळाडू जो एकहाती बदलू शकतो सामन्याचा निकाल…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---