मुंबई । पुढील महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ सोमवारी एका विशेष विमानाने इंग्लंडकडे रवाना झाला. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी वेस्टइंडीजच्या सर्व खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली. सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला.
West Indies depart the Caribbean for Sandals Tour of England. #ENGvWI #MenInMaroon
Read more⬇️https://t.co/ycf4XHBeZC pic.twitter.com/aQkMNLice9
— Windies Cricket (@windiescricket) June 8, 2020
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, मँचेस्टर येथे वेस्ट इंडीजचा संघ पोचल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्याआधी त्यांची कोरोना टेस्ट देखील होईल. त्यानंतर सात आठवड्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल. या दौऱ्यात खेळाडूंना सरकारी दिशानिर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे.
Welcome to England @windiescricket! 👋
We are delighted to have you here and can’t wait for our Test series to get started 🏏 pic.twitter.com/XH9VJlITJL
— England Cricket (@englandcricket) June 9, 2020
या मालिकेतील तीन कसोटी सामने एकवीस दिवसांच्या आत खुल्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. पहिला कसोटी सामना 8 जुलै रोजी साऊथम्पटन येथे खेळवला जाईल. दुसरा कसोटी सामना 16 ते 20 जुलै आणि तिसरा कसोटी सामना 24 ते 28 जुलै दरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. खेळाडूंसाठी येथे सुरक्षित वातावरण असल्याने सामन्यांसाठी ही मैदाने निवडण्यात आली आहे.
वास्तविक पाहता वेस्टइंडीजचा हा दौरा मे आणि जूनच्या दरम्यान होणार होता, पण कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे हा दौरा रद्द स्थगित करण्यात आला होता.
वेस्टइंडीजचा संघ
जेसन होल्डर (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड, नक्रुमा बोनर, क्रॅग ब्रॅथवेट, शमर ब्रूक्स, जॉन कँपबेल, रोस्टन चेज, रकीम कॉर्नवाल, शेन डाउरिच, केमार होल्डर, शाई होप, अल्जारी जोसेफ, रेमन रीफर आणि केमार रोच.
राखीव खेळाडू :
सुनील अंबरीस, जोशुआ डासिल्वा, शॅनन गेब्रियल, कीन हार्डिंग, काइल मेयर, प्रेस्टन मॅकस्वीन, मार्क्विनो मिंडले, शाइनी मोसले, एंडरसन फिलिप, ओशेन थॉमस अाणि जोमेल वार्रिकान.