भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका (IND vs ENG) आजपासून सुरू झाली आहे. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी आयोजित नाणेफेक इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बेन स्टोक्सने कालच पत्रकार परिषदेत आपल्या 11 खेळाडूंची घोषणा केली होती, तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीच्या वेळी अंतिम अकरा खेळाडूंची घोषणा केली.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड संघ : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच.
हेही वाचा
आंद्रे रसेलने दिली शाहरुख खानची पोज, शाहरुखकडून आला हा रिप्लाय; व्हिडिओने चाहत्यांची जिंकली मने
IND vs ENG: भारत-इंग्लंड कसोटी क्रिकेटच्या आकडेवारीवर एक नजर, सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम धोक्यात