T20 Cricketer of the Year: आयसीसीने सूर्यकुमार यादव याची 2023 साठी ‘टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवड केली आहे. त्याने गेल्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती. मार्क चॅपमन, अल्पेश रमाजानी आणि सिकंदर रझा यांना मागे टाकून त्याने हा पुरस्कार मिळवला आहे. 2023 मध्ये, सूर्यकुमारने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 सामने खेळले आणि 48.86 च्या सरासरीने आणि 156 च्या स्ट्राइक रेटने 733 धावा केल्या.
आयसीसी टी-20 प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार दोनदा जिंकणारा सूर्यकुमार यादव हा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. ( Suryakumar Yadav wins ICC Men’s ‘T20 Cricketer of the Year’ award, named twice)
बातमी अपडेट होत आहे…
हेही वाचा
भारताला विश्व चॅम्पियन बनवणारे शिलेदारच टीम इंडियाला नडणार, ‘या’ देशाकडून खेळणार टी20 विश्वचषक 2024
ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल; मिचेल मार्श कर्णधार, स्टार अष्टपैलू खेळाडूचंही संघात पुनरागमन